दैनिक चालु वार्ता माजलगांव प्रतिनिधि- नाजेर कुरेशी
फ़िर्यादी नामे अविनाश मधूकर घनघाव वय 29 वर्षे व्यवसाय – नौकरी रा. मोगरा ता. माजलगाव जि. बीड यांची मोटार सायकल दिनांक 27/03/2025 रोजी 04/00 वाजता दरम्याण पुर्नवादी बँक समोरुन माजलगाव येथुन चोरी गेली होती त्यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असतांना गुप्त बातमीदारांनी माहीती दिली की, आरोपी नामे 1) सचिन सुरेश बौत वय-22 वर्ष व्यवसाय-मजुरी 2) रविंद्र सुरेष बौत वय-26 वर्ष व्यवसाय-मजुरी दोघे रा. साई मंदीर रोड पाथरी ता. पाथरी जि.परभणी ह. मु.जय महेश कारखाना पवारवाडी ता. माजलगाव जि. बीड यांनी चोरली आहे. त्यावरुन सदर आरोपीतांचा शोध घेवुन त्यांना अटक केले. व त्यांनी गुन्हा केल्याचे कबुली दिल्याने त्यांचेकडे अधिक तपास करुन त्यांचेकडुन पुर्णावादी बँक माजलगाव येथुन चोरी केलेल्या 03 मोटार सायकल व इतर ठिकाणावरुन चोरीस गेलेल्या 02 मोटार सायकल जप्त केले असुन एकुण 05 मोटार सायकल किंमत अंदाजे 2,30,000/-रु. मुद्देमाल हस्तगत केला आहे. व अधिक तपास चालु आहे.
सदरची कारवाई मा.नवनीत काँवत पोलीस अधिक्षक बीड, चेतना तीडके अपर पोलीस अधिक्षक आंबाजोगाई, चोरमले साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग आंबाजोगाई, यांचे मार्गदर्शनाखाली राहुल सुर्यतळ पोलिस निरीक्षक पोलीस ठाणे माजलगाव शहर, पोलीस उपनिरीक्षक केरबा माकणे, पोहवा/1508 अनिल भालेराव, पोहवा/12 गणेश तळेकर, पोशि/2299 संतराम थापडे. यांनी केली आहे.
