
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी
मुख्यमंत्री यांचा शंभर दिवस अभियान महाराष्ट्र शासनच्या वतीने राबवीण्यात येत आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी ई – ऑफिस करण्याचा निर्णय घेतला असून त्यादृष्टीने देगलूर तहसील कार्यालयात तयारी सुरू आहे याचं उपक्रमा अंतर्गत देगलूर शहरातील तालुक्यातील सर्व नागरिक तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रमाणात व्हाट्सऑप द्वारे मिळणार असून सेतू सुविधा केंद्र संचालक यांना तसे निर्देश देण्यात येणार आहेत. त्यामुळे बाहेर गावी राहण्याची सोय होणार असून तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी संपूर्ण कार्यालय ई ऑफीस करण्यासाठी निर्देश दिले आहेत त्यादृष्टीने तहसील व अन्य विभाग तयारी करत आहेत. मुख्यमंत्री यांचा १०० दिवसाचे अभियाना अंतर्गत तहसीलदार भरत सूर्यवंशी, व्हाट्सअॅपवर प्रमाणपत्र देण्याची सुविधा सुरू करण्याचा मानस व्यक्त केला.
देगलूर तालुक्यातील आपले सरकार-सेतू सुविधा केंद्र चालविणाऱ्याची लवकर बैठक घेतली जाणार आहे तर उत्पन्नाचा दाखला (मिळकतीचे प्रमाणपत्र,) जात (कॉस्ट सर्टिफिकेट) प्रमाणपत्र रहिवाशी प्रमाणपत्र, वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास (रहिवासी) प्रमाणपत्र, अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र, पत दाखला, जात प्रमाणपत्र, डोंगरी असल्याचा दाखला, इत्यादी प्रमाणपत्र अर्जदारच्या व्हॉट्सअॅपवर पीडीफ च्या माध्यमातून पाठवले जाईल असा नवीन उपक्रम सुरू करण्यात येत आहे.
अनेक विदयार्थी ग्रामीण भागात राहतात बाहेर गावी शिक्षण, कामधंदा, नौकरी व अन्य कारणास्तव गाव सोडूम बाहेर असतात त्यांना मुद्दामहून प्रमाणपत्रसाठीच गावाकडे तहसील कार्यालयात ये-जा करावी लागते सर्व ई सेवा व आपले सरकार चालक यांनी अर्जदाराचा अर्ज घेतानांच व्हॉटस अप मोबाईल क्रमांक घ्यावा. प्रमाण पत्रास मान्यता मिळताच अर्जदाराच्या व्हॉटसअप वर पी.डी.फ. प्रमाणपत्र पाठवून द्यावे, अशी संकल्पना देगलूर तहसीलदार भरत सूर्यवंशी यांची असून लवकरच याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे असे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.
अनेक विदयार्थी ग्रामीण भागात राहतात बाहेर गावी शिक्षण, कामधंदा, नौकरी व अन्य कारणास्तव गाव सोडून कामासाठी बाहेर असतात त्यांना मुद्दामहून प्रमाणपत्रसाठीच गावाकडे तहसील कार्यालयात ये-जा करावी लागते सर्व ई सेवा व आपले सरकार चालक यांनी अर्जदाराचा अर्ज घेतानांच व्हॉटस -अप मोबाईल क्रमांक घ्यावा. प्रमाण पत्रास मान्यता मिळताच अर्जदाराच्या व्हॉटसअप वर पी.डी.फ. प्रमाणपत्र पाठवले जाईल. यामुळे अर्जदाराचा वेळ आणि पैसा वाचेल ..
तहसीलदार भरत सूर्यवंशी देगलूर