दैनिक चालु वार्ता कारंजा लाड प्रतिनीधी – अशोकराव उपाध्ये
कारंजा तालुक्यातील ग्राम खानापूर येथे जलतारा योजना शेवटल्या घटका पर्यन्त पोहोचावी करीता कारंजा तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी शेतकरी मार्गदर्शन शिबीर दि . १० एप्रील रोजी संत गजान महाराज सभागृहात घेतले . या सहविचार सभेत जलतारा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान असल्याचे
शेतकऱ्यांशी संवाद साधतांना कारंजा तहसीलदार कुणाल झाल्टे म्हणाले .शेतातील जलपुनरभरनासाठी जलतारा प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी संजीवणी असून खात्रीने पाणी टंचाई दूर करण्याचा प्रभावी उपाय आहे . जलतारा योजना शेतकऱ्यांच्या हिताची असल्याने ही योजना स्वयंस्फूर्तीने राबवावी असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले . कृषी विभागाचे सहयोगातून तहसील प्रशासनाचे पुढाकारात मरेगाचे अर्थ सहाय्य घेत आपली शेती पाणीदार करावी . एकरी एक ५ x५ x ६ फूट असा शोष खड्डा घेतल्यास पाण्याचा निचरा होऊन जमीन न चिबळता शेतातील बोअर वेल; विहीरीचा जलसाठा समृद्ध होतो तेव्हा शेतकऱ्यांनी जलतारा योजना आपल्या शेतात राबवावी असेआवाहन त्यांनी याप्रसंगी केले . शेतकरी मार्गदर्शन सभे करीता प्रमुख मार्गदर्शक म्हणून तहसीलदार कुणाल झाल्टे तर प्रमुख उपस्थितीत सरपंच कडू; पोलीस पाटील अनील इंगळे ; मंडळ अधीकारी निलेश गुगळे तलाठी शैलेश घोगरे; रोजगार सेवक श्रीकांत बागडे ; महसुल सेवक विष्णू मेश्राम यांचेसह प्रतीष्ठीत व्यक्ती व्यासपीठावर उपस्थीत होते . प्रास्ताविक मंडळ अधीकारी निलेश गुगळे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तलाठी शैलेष घोगरे यांनी केले . कार्यक्रमाला शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थीत होता . कृषी विभागाचे व तहसील प्रशासनाचे सहयोगातून शेतकरी सहविचार सभा संपन्न झाली . गावचे सरपंचानी सर्वांचे आभार मानले .
