
ऑपरेशन सिंदूरबद्दाल भारतीय लष्कराने दिली सविस्तर माहिती…
दरम्यान या हल्ल्याला प्रत्त्युत्तर देत भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूरट मोहिम राबवली आहे. ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले. दरम्यान आज ऑपररेशन सिंदूरबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पाकिस्तान आणि पाकिस्तान व्यप्त जम्मू आणि काश्मीर येथील ९ दहशतवादी तळांवरील १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती डीजीएमओकडून देण्यात आली.
ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देण्यासाठी आज(११ मे) रोजी तीन्ही सेना दलांच्या डीजीएमओंनी पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूरचा उद्देश हा दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करणे हाच होता. या अंतर्गत ९ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले होते, भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून या ठिकाणे निवडण्यात आली होती, ज्यापैकी काही पीओके मध्ये तर काही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात होती. लष्करच्या मुरीदके येथील तळाला देखील यामध्ये लक्ष्य करण्यात आले.