
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या तयारीला सर्वच राजकीय पक्षांनी सुरूवात केली आहे.
यापार्श्वभूमीवर आता राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी अन् बैठका महत्वाच्या ठरत आहे. दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे भेट घेतली. तब्बल अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.
या भेटीवर मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय की, चहा पिण्यासाठी आलेलो. मुंबईतील महत्वाच्या विषयावर चर्चा झाली. या परिसरातून जात असताना राज ठाकरे यांना कॉल केला, तेव्हा त्यांनी चहा प्यायला बोलावले. चहा पिऊन खिचडी खाल्ली. राजकीय खिचडीवर चर्चा करण्याची काही गरज नाही, असं देखील उदय सामंत यांनी म्हटलंय.
राजकारणाच्या पलीकडे देखील आमचे सबंध आहे. आपण देखील तसा विचार करू नये, राजकीय सोडून सर्व गोष्टींवर चर्चा झाली. जेव्हा राजकीय असेल तेव्हा मोठी पत्रकार परिषद घेऊन सांगू. उबाठाला सोडून शिंदेच्या शिवसेनेत लोक येतात, त्यांचं काम पाहून येतात. विजय वड्डेटीवार यांनी देखील वेगळा मार्ग सुचवावा, ते माझे जवळचे मित्र आहेत. संपलेल्या पक्षावर काय बोलायचं? असा देखील टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
महाराष्ट्र मुंबईमध्ये आहे. कोणी कोणालाही भेटू शकतो. राज ठाकरे यांना मी स्वतः कॉल केलेला चहा पिण्यासाठी येऊ का विचारले? ते ये बोलले, असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी आजच्या भेटीवर दिली आहे.
उदय सामंत खासदार संजय राऊत यांच्यावर बोलताना म्हटले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर सातत्याने बोलणाऱ्या राहुल गांधींची साथ सोडून जर सामन्यात हे आले असते तर त्यांचा कुणीतरी विचार केला असता. जगाच्या आणि देशाच्या पाठीवर राहुल गांधी वाटेल, त्या पद्धतीने सावरकर यांच्यावर टीका करतात. सावरकरांनी माफीनामा लिहून दिला. ते इंग्रजांसमोर सरेंडर झाले, ही भूमिका राहुल गांधी यांनी मांडली आहे. त्याचं उत्तर सामनातून देणं अपेक्षित असल्याचं सामंत यांन म्हटलंय.