
दै चालु वार्ता प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड
बद्रीनारायण घुगे
देहू… वाहनांची वर्दळ असलेल्या देहूगांव ते देहूफाटा येलवाडी जाणाऱ्या या रस्त्याची गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्दशा झाली आहे. जागोजागी रस्त्यावरील खड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. रस्त्यांवर सतत अपघात होत आहेत. वाहनधारकांना उन्हाळ्यात धुळीचा अन् पावसाळ्यात चिखलाचा त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्यावरून भंडारा डोंगर जाणाऱ्या भाविकांना तसेच चिंचवड वरून एमआयडीसी जाणाऱ्या वाहनधारकांना मोठा या खड्ड्यात रस्त्यावर मोठी कसरत करावी लागते
चाकण तळेगाव खालुब्रे सावरदरी सुदुंबरे सुधावडी इंदोरी
या गावचे बहुसंख्य वाहनधारक या मार्गाचा वापर करतात. शिवाय एमआयडीसी गाठण्यासाठी हाच जवळचा मार्ग आहे. मात्र या रस्त्यावर की खड्डयात रस्ता हा नागरिकांना त्रस्त करणारा प्रश्न आहे. खड्डे चुकवण्यासाठी वाहनधारक नागरिकांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्याकडे संबंधित प्रशासनातील विभागाचे दुर्लक्ष आहे. उन्हाळ्यात धुळीचे लोट पसरत आहेत पादचारी दुचाकी स्वरांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या धुळीमुळे अपघातासोबतच नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येत आहे.
खड्ड्यांचे अडथळे पार करण्यात येते नाकीनऊ
वाहनधारकांना एमआयडीसी जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणून देहू ते देहूफाटा हा मार्ग आहे. मात्र या रस्त्याची दुरावस्था असल्याने वाहनधारकांची कसरत होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. देहू ते एमआयडीसी दहा मिनिटांचा प्रवास असताना वाहनधारकांना खड्यांमुळे एक तास प्रवास करून एमआयडीसी पोहोचावे लागत आहे. रस्त्याची चाळण झाल्याने रस्त्याचे खड्डे सर्वत्र रस्त्यावर पडलेले आहेत
चाकण तळेगाव मार्गावरील हा रस्ता जोडला जाणार आहे यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक चालते परंतु या रस्त्यावरून खड्डे पडले मुळे रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका पेसेंटला घेऊन जाण्यासाठी हा रस्ता जिव घेणा झाला आहे संबंधित विभागाने लोकप्रतिनिधी हातावर हात ठेवून बसले आहेत आषाढी एकादशी वारीला आणखी भाविकांची गर्दी देहू मध्ये वाढणार त्यामुळे तात्पुरती डागडुजी करावी
तुषार अशोक गाडे ( उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खेड/ प्रसिद्ध निवेदक)
येलवाडी ता.खेड जि पुणे