
कारण जाणून विश्वास बसणार नाही...
आपण बाहेर फिरायला वैगरे गेलो तर राहण्यासाठी हॉटेल हा एक पर्याय असतोच.पण तुम्ही कधी एक गोष्ट लक्षात घेतली आहे का? की, कोणत्याही हॉटेलमध्ये 13 वा मजला नसतो आणि नाही 13 नंबरची रुम. जगातील अनेक हॉटेल्स किंवा जवळजवळ सर्व हॉटेल्समध्ये 13 वा मजला किंवा रुम नंबर 13 नसते.
याचं कारण जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
13 नंबरबद्दलची भीती
जगात असे बरेच लोक असतात ज्यांना 13 क्रमांकाची भीती वाटते. या भीतीमुळे 13 क्रमांक हॉटेल्समध्ये किंवा त्या हॉटेलच्या लिफ्टमध्येही हा नंबर समाविष्ट नसतो. या भीतीला ट्रिस्काइडेकाफोबिया म्हणतात. जगातील अनेक देशांमध्ये लोक 13 क्रमांकाला अशुभ मानतात. अनेक ठिकाणी, 13 हा आकडा भूत आणि आत्म्यांशी देखील जोडला जातो. ज्यांना या फोबियाचा त्रास असतो त्यांना 13 हा आकडा पाहून भीती वाटते.
म्हणून 13 क्रमांक काढून टाकण्यात आला आहे
जर तुम्ही कधी 12 पेक्षा जास्त मजल्यांच्या मोठ्या हॉटेलमध्ये राहिला असाल, तर तुमच्या लक्षात आले असेल की त्या हॉटेलला 13 क्रमांकाचा मजला नसतो. जगात अशी अनेक हॉटेल्स आहेत जी 12 व्या मजल्यानंतरच्या मजल्याला 13 हा क्रमांकच देत नाहीत. हॉटेलच्या लिफ्टमध्येही तुम्हाला 12 नंतर 13 हा आकडा लिहिलेला आढळणार नाही. यामागे कारण ट्रिस्काइडेकाफोबिया हेच असतं.
ट्रिस्काइडेकाफोबिया म्हणजे काय?
ट्रिस्काइडेकाफोबियाने ग्रस्त असलेले लोक 13 हा आकडा पाहून घाबरतात. हे पाहून त्याची चिंता वाढते आणि त्याला घाम येऊ लागतो. बरेच लोक असा दावा करतात की हा आकडा पाहिल्यावर त्यांचे हृदय जास्त वेगाने धडधडू लागते. म्हणून, हॉटेल मालक त्यांच्या हॉटेलमधून 13 क्रमांक काढून टाकण्यासाठी 13 व्या मजल्याचा क्रमांक बदलतात. यामुळे ट्रिस्काइडेकाफोबियाने त्रस्त असलेले अनेक लोक असेही म्हणतात की जर त्यांनी हॉटेलमध्ये 13 क्रमांकाची रुम बुक केली तर त्यांचे काम बिघडते.
13 क्रमांक वगळण्यात आला
प्रत्यक्षात, 12 पेक्षा जास्त मजले असलेल्या इमारतीतून 13 वा मजला प्रत्यक्षात गायब होऊ शकत नाही. मजल्यांची मोजणी करताना, 13 वा मजला हा असतोच पण त्याला 13 हा क्रमांक न देता दुसरा क्रमांक दिला जातो किंवा नाव दिलं जातं. बऱ्याच हॉटेल्समध्ये, 12 नंतरच्या मजल्यांना 12A किंवा 14A असे नंबर दिले जातात. तर अनेक ठिकाणी, 12 व्या मजल्यानंतरच्या मजल्याला 13 हा आकडा न देता थेट 14 हा क्रमांक दिला जातो. आजकाल भारतातील अनेक हॉटेल्समध्येही हा ट्रेंड दिसून येतो.
त्यामुळे तुम्ही कधी कोणत्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी जाल तेव्हा त्या हॉटेलमध्ये 13 नंबर आहे का किंवा दुसऱ्या काही नावाने तो मजला आहे का हे कुतूहल म्हणून तरी नक्की पाहा.