
दैनिक चालु वार्ता नांदेड जिल्हा प्रतिनिधी-
नांदेड – गोल्ला -गोलेवार यादव महासंघाची बैठक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले,या बैठकीत नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील रहिवाशी अभिषेक बकेवाड यांची गोल्ला -गोलेवार महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष पदी निवड द.भ.प.राष्ट्रसंत महाराष्ट्र राज्याचे ब्रॅंड अम्बेसिटर स्वच्छता दूत साईनाथ महाराज वसमतकर बितनाळकर व समाजातील जेष्ठ समाजसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्ये निवड करण्यात आली आहे.
अभिषेक बकेवाड यांचे जिल्हास्तरावरील सामाजिक कार्य व महाराष्ट्रात गोल्ला गोलेवार यादव समाजाचे उल्लेखनिय कार्य आहे असतात, महाराष्ट्र राज्यासह तेलंगणा , कर्नाटक, मध्यप्रदेश, ईतर राज्यात यादव संगम त्यांनी समाजातील सामाजिक शैक्षणिक कार्यक्रमात सहभाग असतो. कोणत्याही पदाची अपेक्षा न करता निस्वार्थी भावनेने सामाजिक कार्य करत असतात, त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन युवक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदांची जवाबदारी दिली आहे.
अभिषेक बकेवाड यांनी सामाजिक कार्याची सुरुवात ई.स.२०१५ मध्ये गोल्ला यादव समाजाची हिमायतनगर तालुका प्रसिद्ध प्रमुख म्हणुन जबाबदारी सांभाळत उत्कृष्ट कामगिरी बजावली तदनंतर नांदेड युवक जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडले असताना गोल्ला -गोलेवार यादव महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड साहेब यांनी अभिषेक बकेवाड यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेऊन यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष युवक पदी नियुक्ती केली आहे.
यावेळी राष्ट्रसंत द.भ.प.श्री. साईनाथ महाराज वसमतकर, बितनाळकर बरबडेकर, गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे प्रदेश अध्यक्ष भूमन्ना आक्केमवाड भोसीकर, सांगली जिल्ह्याचे सचिव श्री बाळासाहेब आंबे, सांगलीचे माजी जिल्हाध्यक्ष श्री मुकुंदजी शितोळे व कृष्णार्थ आंबे, समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री पी. जी. रुद्रवाड सर, नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष श्री रमेशजी रामपूरवार, सचिव श्री अशोकराव कासराळीकर, कोशाध्यक्ष श्री तुकारामजी कैलवाड, कर्मचारी प्रांताध्यक्ष श्री अनुपजी अन्नमवार, कर्मचारी प्रांत सचिव श्री संदेशजी कमठे, नांदेड जिल्हा कर्मचारी कोशाध्यक्ष श्री माधवराव वटपलवाड सर, नवनिर्वाचीत गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे युवा प्रदेश अध्यक्ष श्री अभिषेकजी बक्केवाड, समाजाचे मार्गदर्शक श्री बालाजीराव शेनेवाड, श्री परशुरामजी अक्कमवाड, श्री प्रकाशराव नेरलेवाड, श्री दत्तात्रय जंगीलवाड, श्री उद्धवराव उप्परवाड, श्री सायलूजी कारेवाड, श्री देवीदासजी अक्कमवाड, हिमायतनगर तालुक्याचे नवनिर्वाचीत अध्यक्ष श्री शामशेठ जक्कलवाड, माजी सैनिक श्री विकासजी बलफेवाड, श्री साईनाथजी अन्नमवाड, श्री साईनाथजी निम्मेवाड, श्री मधूकरजी मुरगुलवाड, श्री शंकर राव राऊलवाड, श्री गणेश घोसलवाड, श्री पोतण्णा राऊलवाड, श्री राजेश पुटेवाड, श्री योगेश मंत्री, गुरुदास आक्केमवाड व इतर समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.
निवड बदल तेलंगणा, कर्नाटक राज्यासह यादव संगम व महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.