
बॉक्स ऑफिसवरुन गाशा गुंडाळणार ?
अक्षय कुमारचा ‘हाऊसफुल 5’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रदर्शित होताच एकामागून एक रेकॉर्ड तोडू लागला. सॅक्निल्कच्या मते, या चित्रपटानं फक्त 18 दिवसांतच 177 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
हा चित्रपट वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही ठरला आहे. पण, अचानक चित्रपटाची कमाई थांबली. का? कारण आहे, आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’
अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या कमाईवर ब्रेक लावण्याचं काम दुसरं तिसरं कोणी केलं नसून मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं केलं आहे. त्याचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रदर्शित होताच ‘हाऊसफुल 5’ची कमाई अचानक थांबली. चित्रपटाचं किती नुकसान झालं, हे जाणून घेण्यासाठी, या वर्षी प्रदर्शित झालेल्या काही शेवटच्या मोठ्या चित्रपटांच्या तिसऱ्या रविवारीच्या कलेक्शनमध्ये झालेल्या घटीशी त्याची तुलना करूयात.
दुसऱ्या रविवारी आणि तिसऱ्या रविवारीच्या कलेक्शनमध्ये घट
खाली दिलेल्या तक्त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, या वर्षी प्रदर्शित झालेल्या तीन सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी, ‘छावा’च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रविवारी कलेक्शनमध्ये 39.75 टक्क्यांनी घट झाली आहे, तर ‘रेड 2’च्या दोन्ही रविवारी कलेक्शनमध्ये 51.91 कोटी रुपयांची घट झाली आहे. जर आपण ‘हाऊसफुल 5’च्या कमाईतील घट पाहिली तर ती धक्कादायक आहे, कारण त्याची कमाई सुमारे 70 टक्क्यांनी कमी झाली आहे.
‘सितारे जमीन पर’मुळे ‘हाउसफुल 5’ला नुकसान
वरच्या तक्त्यातील आकडे पाहिले तर, हे स्पष्ट होतंय की, ‘हाऊसफुल 5’च्या कमाईत मोठी घट पाहायला मिळत आहे. असं का होतंय? तर याचं सर्वात थेट उत्तर आहे की, आमिर खानच्या फिल्मला जवळपास 6000 स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आलं. ज्यामुळे ‘हाऊसफुल 5’च्या स्क्रिन्समध्ये मोठी घट पाहायला मिळाली.
याव्यतिरिक्त आमिर खानची फिल्म चारच दिवसांत 67 कोटींहून अधिक कमाई करत आहे आणि याची संडेची कमाई जवळपास 28 कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे जे प्रेक्षक ‘हाऊसफुल 5’ पाहण्यासाठी जाणार होते, त्यांच्याकडे आता आणखी एका फिल्मचा पर्याय आला आहे आणि प्रेक्षकांनी ‘हाऊसफुल 5’कडे पाठ फिरवून ‘सितारे जमीन पर’ची निवड केली आहे.
‘हाऊसफुल 5’ची आतापर्यंतची कमाई किती ?
हाऊसफुल 5’नं आज रिलीजच्या 18व्या दिवशी रात्री 10.20 वाजेपर्यंत सॅक्निक्लवर देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, 1.08 कोटींची कमाई केली आहे. तर फिल्मचं आतापर्यंतचं टोटल कलेक्शन 177.18 कोटी रुपये झालं आहे. चित्रपटानं एका दिवसांत आतापर्यंत केलेलं हे सर्वात कमी कलेक्शन आहे.