
दैनिक चालु वार्ता, नांदेड प्रतिनिधी- प्रा. विजयकुमार दिग्रसकर
शेतकरी राजांनी मृग नक्षत्रात पाऊस पडला म्हणून लगबगीने पेरणी केली..
जसी पेरणी झाली तसा पावसात खंड पडला शेतकऱ्यांनी पदरमोड करून ,व्याजाने व्यापाऱ्यांकडून खत बियाणे घेऊन कशी तरी पेरणी केली त्यात जवळपास पावसाचा 14 दिवसापासूनचा खंड पडला आणि उगवलेले पिकं अक्षरश वाळून जात आहेत..
एकीकडे एकवेळ पेरणीची शेतकऱ्यांची परिस्थिती नाही तिथे तो दुबार पेरणी कसा करेल..?
शेतकरी बांधव हवालदिल झाला असून आकाशाकडे नजर लावून बसला आहे .
संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. सरकारने किमान दुबार पेरणीसाठी खतबियाने उपलब्ध करुन देण्यात यावे..
कापूस,सोयाबीन यांच्या बॅगा यांचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता घ्यावी.. अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होताना दिसत आहे .
शेतकरी यांची अवस्था खूप बिकट आहे व परिस्थिती आणीबाणी सारखी आहे तरी सरकारने तत्काळ काहीतरी उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.