
दैनिक चालु वार्ता कोल्हापूर प्रतिनीधी – पंडित चौगुले
कोल्हापूर: दि. 26 :- महाराष्ट्राचे नव्हे तर पूर्ण भारताचे आरक्षण जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी आनंदोत्सव व अभिवादन साजरा करण्यात आला.
छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळी पुष्पगुच्छ घालण्यात आले तसेच छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांनी छत्रपती शाहू महाराज यांचे पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले यावेळी छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाचे अधिष्ठाता माननीय श्री मोरे साहेब यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटण्यात आली कर्मचारी नितीन शिंदे, सुरज गायकवाड, राजू मारूडा, हेमंत मारूडा, व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच ऐतिहासिक बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार विविध संघटनांचे अध्यक्ष व कार्यकर्ते यांनी घातले.
दसरा चौकात कै. सिताराम रास्ते फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सतीश रास्ते यांनी पुष्पहार घालून आनंद उत्सव साजरा केला यावेळी त्यांच्या फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कळंबा : छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे अवचित साधून एकता हॉटेल कामगार वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांचे तर्फे कोल्हापुरी मिसळ मोफत वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख उद्घाटक माननीय शारंगधर देशमुख व प्रमुख उपस्थिती खासदार श्रीमंत शाहू महाराज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, खासदार धनंजय महाडिक,आमदार राजेश क्षीरसागर, माननीय श्री अण्णासाहेब चकोते साहेब व मिसळ प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजारामपुरी शाहूनगर येथे छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास कोल्हापूर महानगरपालिकेचे सहाय्यक शहर उप अभियंता वेंकटेश सूर्यवंशी साहेब व माननीय श्री विजय जाधव भाजपा जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते हार घालण्यात आला . यावेळी श्री प्रशांत अवघडे,श्री राहुल सोनटक्के, द्रविड भोरे,धनाजी शिंदे,शनी आवळे, सतीश रास्ते, सचिन दीक्षित,बबलू नागावकर, व राजाराम पोलिस स्टेशनचे कर्मचारी श्री बोटे साहेब आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिवर्तन फाउंडेशन च्या वतीने दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन मध्ये शाहू जयंतीचे अवचित साधून मान्यवरांना पुरस्कार देण्यात आला यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास माननीय श्री योगेश कुमार गुप्ता पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या हस्ते घालण्यात आला व परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री अमोल कुरणे यांनी श्री गुप्ता साहेबांचे स्वागत केले यावेळी राष्ट्रीय नेते स्वराज्य क्रांती सेना पॅंथर आर्मी माननीय डॉक्टर राजेंद्र सिंग वालिया,संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संतोष यश आठवले, दिगंबर कुलकर्णी व फाउंडेशनचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.