
दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी-तुषार नाटकर
छ. संभाजीनगर ( पैठण): राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी नागरी सहकारी बँक, पैठण यांच्या वतीने इयत्ता 10वी व 12 वीमध्ये उच्च गुणवत्तेने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा गुरुवारी (दि. 26 जून) पैठण येथील माहेश्वरी भक्त निवास येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपजिल्हाधिकारी सौ. अंजली धानोरकर होत्या, तर अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन रविंद्र शिवाजीराव काळे होते. सहायक निबंधक बलराम नवथर यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. यावेळी विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक, मुख्याध्यापक व प्राचार्य यांचा देखील सन्मान करण्यात आला. गौरवचिन्ह, पदक व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास तालुक्यातील अनेक मान्यवर, नागरिक व शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यामध्ये व्हा. चेअरमन भाऊसाहेब औटे, संचालक हरीपंडीत गोसावी, रामचंद्र काळे, पाशा धांडे, पृथ्वीराज चौहान, शंकरराव राऊत, अरुण नरवडे, अशोक जाधव, दशरथ सोनवणे, श्यामसुंदर लोहिया, राजेंद्र टेकाळे, कारभारी लोहकरे, सौ. तनुजा जाधव, तज्ज्ञ संचालक अॅड. राजेंद्र धरपळे, गणेश शिलवंत, अॅड. किशोर वैद्य, दत्तात्रय फटांगडे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, हसनुद्दीन कट्यारे, फाजल टेकडी, राजू निवारे, उदय काळे, प्रा. संतोष गव्हाणे, सोमनाथ जाधव, ज्ञानेश्वर पानखडे, आप्पासाहेब सोनवणे, लक्ष्मण चौरे आदींचा समावेश होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई.आय. पठाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी. व्ही. म्हस्के, सुधाकर शिंदे, विजय पोषणगीर, कृष्णा काकडे, अमोल काळे, रेवती राजनिकर, रत्नदीप मुळे, बाळू दसपुते, किशोर धोकते, आंबेड पठाण, भाऊसाहेब कणसे, आशिष पवार, प्रकाश निवारे, फौजी जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले.