
दैनिक चालु वार्ता कारंजा लाड -अशोकराव उपाध्ये
गेल्या ७० वर्ष्याच्या कालखंडांत स्टेट बँकेने पारदर्शी व्यवहार ठेऊन आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे. तसेच या बँकेने अनेक क्षेत्रातील लोकांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने या बँकेने लोकांचा विश्वास प्राप्त केला आहेअसे उदगार तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी काढले.
स्टेटबँकेच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून क्षेत्रिय प्रबंधक आशिषकुमार सिंग, गटशिक्षण अधिकारी श्रीकांत माने, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर शार्दुल डोणगावकर, भाजपा शहर प्रमुख सौ.प्राजक्ता माहीतकर, भारत गॅसचे संचालक शेखर बंग डॉ.अभिजित सोनटक्के, बँकेचे व्यवस्थापक संग्राम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वर्धापन दिनाचे औचित्य साधून स्टेट बँक ऑफ इंडिया व कारंजा रक्तदान चळवळ यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले. भरपूर पाऊस असतानाही रक्तदात्यांनी उत्साहाने रक्तदायाकरिता हजेरी लावली. प्रारंभी संग्राम पाटील यांनी सतराव्या वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा आपल्या प्रास्ताविक भाषणातून घेतला. तर क्षेत्रिय प्रबंधक आशिष सिंग यांनी सामाजिक दायित्व स्वीकारून स्टेट बँक अनेक समाजोपयोगी कार्यक्रम घेत असल्याचे सांगितले. यावेळी डॉ.शार्दूल डोंणगावकर, सौ.प्राजक्ता माहीतकर यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर सुशील देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन बँकेचे मंदार काटे यांनी मानले.
शिबिराला कारंजातील मान्यवरांनी भेट देऊन आयोजकांचा उत्साह वाढवीला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बँकेचे कर्मचारी, डॉ.हेडगेवार रक्तपेढीचे कर्मचारी, रक्तदान चळवळीचे कार्यकर्ते व आर्ट ऑफ लिविंग परिवार यांनी अथक परिश्रम घेतले.