
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : उदगीर येथील राजर्षी शाहू विद्यालयात लोकनेते छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरी करण्यात आली. शाहू महाराजांच्या विचारांचा प्रसार करत समाजात न्याय, समता आणि बंधुता रुजवण्याचा संदेश देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.
प्रभातफेरी व सामाजिक संदेशाचे फलके
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीने झाली. शाळेपासून ते शाहू चौक उदगीरपर्यंत निघालेल्या फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी “झाडे लावा – झाडे जगवा”, “पाणी वाचवा”, “रक्तदान हेच जीवनदान” असे सामाजिक आणि पर्यावरण विषयक संदेश देणारे फलक हातात घेतले होते. शाहू महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून लेझीम पथकाचे संचलन व देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
यावेळी विद्यालयात मार्च 2025 च्या दहावीच्या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
सत्कारप्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे:
प्रथम क्रमांक – आर्य कार्तिक
द्वितीय क्रमांक – राठोड सागर
तृतीय क्रमांक – भोसले अश्विनी
एन.एम.एम.एस स्कॉलरशिप धारक – पाटील सृष्टी
या सर्व विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, शाल, हार, बक्षीस व ‘वैदिक प्रश्नावली’चे पुस्तक देऊन पालकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
कार्यक्रमाचा एक विशेष भाग म्हणजे रक्तदान शिबिर, ज्याला उदगीरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिराचे उद्घाटन एम.एस. मंडळाचे अध्यक्ष श्री. देविदासराव आवटे, सचिव प्रा. बाबुराव नवटके, कानवटे साहेब, सहसचिव वृचिकेत जाधव साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. मुख्याध्यापक कल्याणी एस.टी. देखील उपस्थित होते.
या वेळी वैदिक प्रश्नावली या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. सचिव बाबुराव नवटके सरांनी विद्यार्थ्यांना ‘संस्कार ही काळाची गरज आहे’ अशा शब्दांत मार्गदर्शन केले. रक्तदान शिबिर सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालले असून एकूण ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
स्पर्धांचे आयोजन
या दिवशी भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि लेखन स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन बिरादार एस.ए. यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक कल्याणी सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चौगुले सर, जाधव मॅडम, कासले सर, सावंत सर, गोणे सर, घोडके सर, घोंगडे सर, मोरे सर, पाटील सर, मठपती सर, कनाडे सर, सय्यद मामा, प्रशांत मामा यांनी परिश्रम घेतले.
शाहू महाराजांच्या विचारांचा प्रसार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेला हा उपक्रम समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचे उदाहरण ठरला आहे.