
DMK खासदार कनिमोझी यांच्या उत्तरावर टाळ्यांचा कडकडाट…
इयत्ता पहिलीपासून हिंदी तिसरी भाषा म्हणून त्रिसूत्री भाषा धोरणाविरोधात विरोधकांनी शड्डू ठोकले आहेत. मुंबईत 5 जुलै रोजी हिंदी सक्तीविरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिणेतील राज्यातही हिंदीला नकारघंटा वाजवण्यात येत आहे.
भाषिक वादाची हलगी वाजत असतानाच तामिळनाडूतील द्रविड मुनेत्र कळघम (DMK) या पक्षाच्या खासदार कनिमोझी करुणानिधी यांनी भारताची भाषा कोणती यावर एकदम खणखणीत उत्तर दिले. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
टाळ्या काही थांबेचनात
भारताची राष्ट्रीय भाषा कोणती असा सवाल कनिमोझी यांना विचारण्यात आला होता. त्यांच्या उत्तराने सभागृहात टाळ्यांचा एकच गजर झाला. त्यांच्या चपखल उत्तराने उपस्थितांची मनं जिंकली. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी जे उत्तर दिले, ते एकदम व्हायरल झाले. कनिमोझी यांना भारताची राष्ट्रीय भाषा कोणती असा सवाल विचारण्यात आला होता. ‘विविधतेत एकता ही भारताची राष्ट्रीय भाषा आहे’, असे उत्तर त्यांनी दिले.
त्यांच्या या उत्तराने उपस्थित लोकांची मनं जिंकली. त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्याविषयीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. देशातील दक्षिण आणि पश्चिम भागात हिंदी लादण्यात येत असल्याचा दावा विरोधक आणि भाषा प्रेमींकडून गेल्या काही वर्षात करण्यात येत आहे. महाराष्ट्रात तर हिंदी भाषा धोरणाविरोधात मुंबईत येत्या 5 जुलै रोजी मनसे आणि उद्धव सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि इतर अनेक पक्ष, संघटना एकत्र येत आहे. त्यांचा मोठा मोर्चा आहे. त्यावेळी कनिमोझी यांचे उत्तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
सोशल मीडियावरील हा व्हिडिओ या महिन्याच्या सुरुवातीचा असल्याची माहिती समोर येत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धूळ चारली. जगाला भारताची भूमिका समजावून सांगण्यासाठी आणि पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडण्यासाठी भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ विविध देशात गेले होते. कनिमोझी या पण या शिष्टमंडळात होत्या. सध्या राज्यात हिंदी भाषेवरून वाद वाढला आहे. सरकारविरोधात विरोधक असा सामना रंगला आहे. त्यावेळी या व्हिडिओची पण चर्चा रंगली आहे.