
राज-उद्धव ठाकरेंनी कितीही…
महाराष्ट्रात सध्या हिंदी सक्तीच्या विषयावरुन राजकारण तापलं आहे. येत्या 5 जुलै रोजी हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधुंचा एकत्र मोर्चा निघणार आहे. आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा 6 जुलै रोजी निघणार होता.
7 जुलै रोजी उद्धव ठाकरे गटाच आंदोलन होतं. पण नंतर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली. मोर्चासाठी 5 जुलैची तारीख निश्चित करण्यात आली. आता 5 जुलैला दोन्ही ठाकरे बंधू आणि त्यांचे हजोर कार्यकर्ते एकत्र मोर्चात चालताना दिसतील. पहिली ते चौथी पर्यंत प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषा सक्तीची आहे, त्याविरोधात हा मोर्चा आहे, असं मनसे आणि उद्धव ठाकरे गटाच म्हणणं आहे. पण प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषेची सक्ती नाही, तो ऑप्शनल विषय आहे, असं राज्य सरकारच म्हणणं आहे. महाराष्ट्र सरकारने प्राथमिक शिक्षणात हिंदी विषयाचा पर्यायच ठेऊ नये, असं मनसे आणि उद्धव ठाकरे गटाच म्हणणं आहे.
दरम्यान हिंदी सक्तीच्या विषयावरुन मुंबईतील वातावरण आधीच तापलेलं आहे. या परिस्थितीत आता उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांच्या एका वक्तव्यामुळे वातावरण आणखी तापू शकतं. “राज ठाकरे यांनी कितीही कार्यक्रम घेऊं दे, उद्धव ठाकरे यांनी कितीही कार्यक्रम घेऊं दे, भाजपने कितीही कार्यक्रम घेऊं दे. एक उत्तर भारतीयच या मुंबईची महापौर बनेल असं वक्तव्य सुनील शुक्ला यांनी केलं आहे.
भाजपची यावर भूमिका काय?
उत्तर भारतीय समाज जागा झाला आहे. हे हिंदू विरोधी, हिंदी विरोधी लोक आहेत. उत्तर भारतीय विकास सेनेचे उमेदवार जिंकवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. येणाऱ्या निवडणुकीत उत्तर भारतीय विकास सेनेचे लोक जिंकतील. आमचाच महापौर होईल” असा दावा उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, ‘मुंबईचा महापौर कोण होणार हे मुंबईची जनता ठरवेल’