
दैनिक चालु प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
जालना (मंठा )
शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार दि.२९ जून रोजी शिवसेना तालुका प्रमुख मंठा मा.श्री.प्रदिप भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्यात आले आंदोलत हिंदी सक्तीच्या आदेशाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला.
मराठी ही केवळ भाषा नसून आपला अभिमान आणि आपली संस्कृती आहे. त्यामुळे मराठीला डिवचण्याचा प्रयत्न आम्ही शिवसैनिक खपवून घेणार नाही. हिंदी सक्तीबाबतचा निर्णय आम्हाला मान्य नाही. बळजबरीने लादण्याचा कुणी प्रयत्न करु नये. आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. जशास तसे उत्तर देऊ. महाराष्ट्रात चालेल तर फक्त मराठी. इतर भाषांचा आम्ही सन्मान करतो. मात्र आमच्या संस्कृतीवर हल्ला सहन केला जाणार नाही. यावेळी “हिंदी सक्तीच्या महाराष्ट्र शासनाच्या जी आर ची होळी करून निर्दशने व निषेध करण्यात आला आदेशाची होळी करतेवेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते. तालूका संघटक ज्ञानेश्वर सरकटे आनंता वैद्य युवा सेनेचे डिगांबर बोराडे बाळासाहेब वैद्य आवेस पठाण रवी काळे सचिन चव्हाळ इम्रान पठाण गोरख चव्हाण ऋतिक जाधव संदीप ढेगळे विष्णू वरकड राहुल बोराडे दत्ता गोरे गजानन झोल संजय बोराडे राजेश पवार रामेश्वर बोराडे प्रदीप घोडके प्रवीण पंडित शेख एहसान ऋषी वाघ सचीन घेणे भागवत गिराम प्रकाश हातकडकेसह बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.