
जीआरची होळी करत म्हणाले; सक्ती आम्ही…
राज्य सरकारच्या त्रिभाषा धोरणाविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. रविवारी मुंबईच्या आझाद मैदानात कृती समितीचे आंदोलन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून महायुती सरकारच्या हिंदी सक्तीच्या जीआरची प्रतीकात्मक होळी करण्यात आली.
यावेळी ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारच्या कारभारावर हल्लबोल केला.
राज्य सरकारने अभ्यास न करता हिंदी सक्तीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही. त्याविरोधात आम्ही मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारच्या हिंदी सक्तीच्या जीआरची प्रतीकात्मक होळी केली. यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई उपस्थित होते. यावेळी महायुती सरकारच्या हिंदी सक्तीच्या धोरणावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हिंदीची पहिलीपासून अंमलबजावणी करण्याच्या जीआरची होळी करण्यात येत आहे. या आंदोलनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आझाद मैदानात दाखल होत रस्त्यावर उतरले होते.
दरम्यान, हिंदी सक्तीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या मोर्चाला अद्याप पोलिसांची परवानगी मिळालेली नाही. हा मोर्चा 5 जुलैला गोरेगाव चौपाटीपासून निघणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेही या मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात मराठी बांधव सहभागी होण्याची शक्यता आहे.