
दैनिक चालू वार्ता माळशिरस प्रतिनिधी – राजेंद्र पिसे
पिंपरी (ता. माळशिरस): माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या “निरा देवघर पाणी संघर्ष पदयात्रेच्या” सहाव्या मुक्कामी पिंपरी येथे मोठी घडामोड घडली. माळशिरस तालुक्यातील २२ गावांना कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने शिंगोर्णी ते शिखर शिंगणापूर ही पदयात्रा काढण्यात आली आहे.
याच पदयात्रेस शिवसेना तालुकाप्रमुख सतीश सपकाळ यांनी अधिकृत जाहीर पाठिंबा दिला. यावेळी शिवसेना ओबीसी आघाडीचे प्रदेश उपप्रमुख भिमराव भुसणर, जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे, तालुका उपप्रमुख तानाजी भोळे, तसेच सुनील साठे, हनुमंत कर्चे, रणजित गायकवाड, नातेपुते शहरप्रमुख पै. निखिल पलंगे, अनिल दडस, भैया लांडगे, मंगेश अवघडे, अजित भिसे, गणेश खंडागळे, शिवराज पलंगे, पै. शंकर कर्चे, समाधान सकट, सलमान शेख, राजू बोराडे, सौरभ मुळे, विशाल लांडगे, कृष्णा पाटील, मुकेश झेंडे, अजय खिलारे आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पाणी संघर्षाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळू लागल्यामुळे या लढ्याला आणखी बळ मिळाले आहे. उपस्थितांनी पदयात्रेला जोमात प्रतिसाद देत ही लढाई शेवटपर्यंत नेण्याचा निर्धार केला.