
दैनिक चालु वार्ता पालघर प्रतिनीधी – रवी राठोड
पालघर : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची मुख्य कंपनी अंतर्गत स्थापन असलेल्या “पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ उपकंपनी” तसेच “राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ उपकंपनी” अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनेसाठी पात्र व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
1) बीज भांडवल कर्ज योजनेची कर्ज मर्यादा प्रकल्प रु.5 लाखापर्यंत असुन बँकेचा सहभाग 75 टक्के असून महामंडळाचा सहभाग 25 टक्के असुन व्याज दर हा वार्षिक 4 टक्के असुन परतफेडीचा कालावधी हा 5 वर्षे आहे. ही योजना कृषी संलग्न व पारंपारिक उपक्रम, लघु व्यवसाय व अन्य तांत्रिक लघु उद्योग उत्पादन, व्यापार व विक्री सेवा क्षेत्रासाठी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न शहरी भागाकरीता रु.1 लाख व ग्रामीण भागाकरीता 98,000/- पर्यंत मर्यादित असावे. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आणि विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा वय 18 ते 50 वर्ष दरम्यान असावे. अर्जदाराचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे अनिवार्य राहिल. कर्ज मागणी अर्ज फक्त अर्जदार यांनाच मिळेल. अर्जदार कोणत्याही बँकेच्या कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. अर्ज करतेवळी सदर प्रकल्पासाठी यापूर्वी महामंडळाच्या किंवा इतर कोणत्याही महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र 1. जात प्रमाणपत्र 2. उत्पन्नाचा दाखला किंवा नॉन क्रिमिलेअर लेयर प्रमाणपत्र 3 रेशन कार्ड 4 रहिवासी प्रमाणपत्र 5 वयाचा पुरावा / शाळेचा दाखला. 6 आधार कार्ड / पॅन कार्ड 7. व्यवसायाच्या अनुषंगाने कोटेशन आवश्यक राहील.
2) थेट कर्ज योजनेची कर्ज मर्यादा रु.1 लाखापर्यंत असुन महामंडळाचा सहभाग 100 टक्के आहे. ही योजना कृषी संलग्न व पारंपारिक उपक्रम, लघु व्यवसाय व अन्य तांत्रिक लघु उद्योग उत्पादन, व्यापार व विक्री सेवा क्षेत्रासाठी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु.1 लाखाच्या मर्यादित असावे. कर्ज मागणी अर्ज फक्त अर्जदार यांनाच मिळेल. नियमीत कर्ज परतफेड करणा-या लाभार्थींना व्याज आकरण्यात येणार नाही. तसेच नियमीत कर्ज परतफेड न करणा-या लाभार्थींना जेवढे कर्जाचे हप्ते थकीत होतील, त्या रक्कमेवर द.सा.द.शे. 4 टक्के व्याज आकरण्यात येईल. अर्जदार कोणत्याही बँकेच्या कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. अर्ज करतेवळी सदर प्रकल्पासाठी यापूर्वी महामंडळाच्या किंवा इतर कोणत्याही महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. थेट कर्ज योजनेची कर्ज मर्यादा रु.1 लाखापर्यंत असुन ही योजना कृषी संलग्न व पारंपारिक उपक्रम, लघु व मध्यम उद्योग, उत्पादन, व्यापार व विक्री सेवा क्षेत्रासाठी आहे. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा आणि तो विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील असावा. वय 18 ते 55 वर्ष दरम्यान असावे. अर्जदाराचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे आवश्यक राहील. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र 1. जात प्रमाणपत्र 2. उत्पन्नाचा दाखला किंवा नॉन क्रिमिलेअर लेयर प्रमाणपत्र 3 रेशन कार्ड 4 रहिवासी प्रमाणपत्र 5 वयाचा पुरावा / शाळेचा दाखला. 6 आधार कार्ड / पॅन कार्ड 7. व्यवसायाच्या अनुषंगाने कोटेशन आवश्यक राहील.
3) वैयक्तिक कर्ज व्याज परतफेड योजना (आय.आर 1) ची कर्ज मर्यादा रु.15 लाखापर्यंत असुन ही योजना कृषी संलग्न व पारंपारिक उपक्रम, लघु व मध्यम उद्योग, उत्पादन, व्यापार व विक्री सेवा क्षेत्रासाठी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु.8 लाखाच्या मर्यादित असावे. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आणि विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा वय 18 ते 50 वर्ष दरम्यान असावे. अर्जदाराचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे अनिवार्य राहिल. अर्जदाराने महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे आवश्यक असेल. अर्जदार कोणत्याही बँकेच्या कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. अर्ज करतेवळी सदर प्रकल्पासाठी यापूर्वी महामंडळाच्या किंवा इतर कोणत्याही महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराचे कर्ज प्रकरण हे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) आणि तत्सम संगणक प्रणालीद्वारे प्रकरण हाताळण्यास सक्षम असलेल्या बँकेत केलेले असावे. कुटुंबातील एकावेळी एकाच सदस्याला कर्ज योजनेचा लाभ घेता येईल. लाभार्थ्यांने मध्येच नियमित कर्जफेड नाही केली तर, व्याज परतावा दिला जाणार नाही. लाभार्थ्यांने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरू असल्याचे किमान दोन फोटो उपलोड करणे बंधनकारक असेल.
4) गट कर्ज व्याज परतावा योजनेत (आय.आय.2) कर्ज मर्यादा रु. 10 ते 50 लाखपर्यंत असुन ही योजना कृषी संलग्न व पारंपारिक उपक्रम, लघु व मध्यम उद्योग, उत्पादन, व्यापार व विक्री सेवा क्षेत्रासाठी आहे. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा आणि तो विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील असावा. वय 18 ते 45 वर्ष दरम्यान असावे. अर्जदाराचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे आवश्यक राहील. अर्जदाराने महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे आवश्यक असेल. गटातील सर्व लाभार्थ्यांचे प्रमाणित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु.8 लाखाच्या मर्यादेत असावेत. या दोन्ही योजनचे वेबपोर्टलवर www.vjnt.in ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र 1. जात प्रमाणपत्र 2. उत्पन्नाचा दाखला किंवा नॉन क्रिमिलेअर लेयर प्रमाणपत्र 3 रेशन कार्ड 4 रहिवासी प्रमाणपत्र 5 वयाचा पुरावा / शाळेचा दाखला. 6 आधार कार्ड / पॅन कार्ड 7. व्यवसायाच्या अनुषंगाने कोटेशन आवश्यक राहील. अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.) आफरीन अपार्टमेंट, रुम नं. 201, नवली फाटक जवळ, साईकृपा सॉ मिल समोर, नवली रोड, जिल्हा पालघर येथे मो. नं. 9967668278/7040321381 वर संपर्क साधावा. तरी पालघर जिल्हयातील जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसंतराव नाईक विजाभज विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री. पोपट बाजीनाथ गिते यांनी केले आहे.