
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी-लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- उस्माननगर पोलिस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या अनेक मोठ्या गावातील शाळा महाविद्यालय मध्ये उस्माननगर पोलिसांकडून अंमली पदार्था विषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली तसेच यावेळी कायदेविषयक माहिती देण्यात आली शाळेतील मुलांसाठी डायल ११२,पोलीस दिदी,
पोलीस काका,महिला सुरक्षा,पॉक्सो कायदा, ट्रॅफिक कायदा यासह विविध उपक्रमाची माहिती देऊन जागृती करण्यात आली.
या उपक्रमासाठी पोलिस ठाण्या अंतर्गत येणारे किसान विद्यालय उमरा ता. लोहा, संजय गांधी महाविद्यालय कलंबर (बू), साईबाबा हायस्कूल मारतळा,भीमा शंकर विद्यालय शिराढोण, संत बाळगिर महाराज विद्यालय कापसी (बू), समता विद्यालय उस्माननगर आदी गावातील शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली
विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थापासून दूर रहावे, हे पदार्थ शरीरासाठी कसे हानिकारक आहेत त्यामुळे होणारे नुकसान आदींची माहिती देण्यात आली . हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उस्माननगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार,पोलिस उपनिरीक्षक गजानन गाडेकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील सूर्यवंशी, अशोक हंबर्डे, मधुकर पवार, सुशील कुबडे, विश्वनाथ बोरकर, निळकंठ श्रीमंगले, गंगाधर चिंचोरे,वडजे आदींनी परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थी, शिक्षक, पालक,पोलिस पाटील आदी उपस्थित होते.