
दैनिक चालु वार्ता उमरी प्रतिनिधी-श्रीनिवास मुक्कावार
तळेगाव जि. प. के. प्रा शाळा तळेगाव केंद्रीय मुख्याध्यापक श्री मुक्कावार एस.के. हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. गोदावरी शिक्षण संस्था तळेगाव व बापूसाहेब गोरठेकर विद्यालय तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष डॉ. विक्रमजी देशमुख होते तर प्रमुख अतिथी खदगाये बी.बी. सर , रामूरेडी कप्पावार, सतीशराव देशमुख चेअरमन तळेगाव, होते. यावेळी अध्यक्ष व अतिथी यांच्या हस्ते मुक्कावार सरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मु. अ. सुरकुटवार एस. एन. यांनी केले. तर खदगाये सरानी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मधुकर तुपतेवार, मा. सरपंच गंगाधर शिगळे, सभाजी पा.जाधव, गणेश पा. जाधव, गणपत शिगळे, अयुब पठाण, खयास बेग, सुरेश कप्पावार, प्रदीप खडलोटे,शेख ताजोददीन, मझहर बेग, कार्यक्रमाच सुत्रसंचलन तिजारे के.ए. यांनी केले तर आभार पवार एस. डी. यांनी मानले.