
दैनिक चालु वार्ता अहमदपुर तालुका प्रतिनिधी -श्री हाणमंत जी सोमवारे
==============
लातूर(अहमदपुर):-
तालुक्यातील मुख्य ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शासनाने विविध प्रकारच्या माध्यमातून शासकीय यंत्रणेने ग्रामीण भागातील विकास कसा साधता येईल हे सुलभतेने पाहत आहे म्हणून त्याचं एक उदाहरण म्हणजे मोजे सावरगांव ( थोट ) आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावरगाव थोट येथील गावच्या प्रथम नागरिक सौ .अनुपमाताई खंदारे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या
तर पंचायत समिती अहमदपूरचे विस्तार अधिकारी श्री केंद्रे साहेब तसेच साचने साहेब उपस्थित होते तर याप्रसंगी सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे ग्रामपंचायत कार्यालय तर्फे सत्कार करण्यात आला आहे तर सर्वप्रथम मा.
साचने साहेब विस्तार अधिकारी पंचायत समिती अहमदपूर यांनी कृषी विषयावर ज्या योजना उपलब्ध आहेत आहेत त्याविषयी सविस्तर माहिती दिली
आरोग्य विभागाचे श्री चाफेकानडे आरोग्य सहाय्यक यांनी आरोग्य विषयाच्या अनुषंगाने ज्या योजना आहेत यांची सविस्तर माहिती दिली त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरवदे मॅडम यांनी शिक्षण विषयी माहिती दिली तसेच अंगणवाडी सुपरवायझर श्रीमती आढाव मॅडम यांनी आपल्या योजनेची माहिती सांगितली पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती अहमदपूर डॉक्टर सरकुंडे डी.बी. यांनी पशुसंवर्धन विभागाच्या योजनेची माहिती दिली तसेच महाराष्ट्र रोजगार हमी योजनेविषयी श्री पांचाळ साहेब यानी रोजगार हमीच्या अनेक योजना आहेत त्या सर्व योजनाची माहिती सविस्तर चर्चा करुन दिली आहे, तर ग्रामीण भागातील महिलेचा आर्थिक विकास
बचत गटाच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्या विषयावर श्रीमती राठोड क्रांती यानी सविस्तर माहिती दिली.
शिक्षण विभागाच्या ज्या योजना आहेत त्याविषयी केंद्रप्रमुख श्री पाटील एम. एस. यानी सविस्तर माहिती सांगितली आहे तर
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री पाटील मोहनराव यानी केले व आभारप्रदर्शन ग्रामसेवक श्री राजगीरवाड साहेब यानी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री बंडा स्वामी ,श्री सचिन कोरनुळे.श्री नवनाथ कुरे. श्री बापुराव पाचाळ सहकार्य केले व सुंदर नियोजन करून कार्यक्रम यशस्वी पार पाडला.