
प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडियांचे राज ठाकरेंना थेट आव्हानचे राज ठाकरेंना थेट आव्हान…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी मीरारोडमधील एका मिठाई विक्रेत्यावर मराठी न बोलल्यामुळे केलेल्या मारहाणीवरून राज्यात पुन्हा एकदा ‘मराठी विरुद्ध अमराठी’ हा वाद पेटला आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती आणि केडियानोमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोशल मीडियावर टॅग करत संतप्त प्रतिक्रिया दिली असून, मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा! असे आव्हानच दिले आहे.
सुशील केडिया यांनी ‘एक्स’ या प्लॅटफॉर्मवर राज ठाकरे यांना थेट टॅग करत लिहिले आहे की, मी गेली ३० वर्षे मुंबईत राहत असूनही मराठी फारशी शिकलेलो नाही. राज ठाकरेसारख्या लोकांना जोपर्यंत ‘मराठी माणसाची काळजी घेण्याचं नाटक’ करण्याची परवानगी मिळत राहील, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. काय करायचं ते करा!”
त्यांची ही पोस्ट काही तासांतच व्हायरल झाली असून, सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक केडियांच्या मत स्वातंत्र्याचे समर्थन करत आहेत, तर काहींनी त्यांच्यावर ‘मराठी अस्मितेचा अपमान’ केल्याचा आरोप केला आहे.
दिवसांपूर्वी मीरारोडमध्ये जोधपूर मिठाई नावाच्या दुकानात मनसे कार्यकर्त्यांनी केवळ हिंदीत बोलल्यामुळे एका अमराठी दुकानदाराला मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत गेल्या.
या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत मीरा भाईंदर भागातील अमराठी व्यापाऱ्यांनी गुरुवारी मोर्चा काढला. या मोर्चात हजारो व्यापारी सहभागी झाले. मात्र, मनसेने या मोर्चामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हटले आहे की बुधवारी रात्री मी संबंधित व्यक्तीला भेटलो होतो. त्यांनी कोणताही मोर्चा न काढण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र गुरुवारी अचानक हजारो व्यापारी रस्त्यावर आले. त्यामुळे हा मोर्चा व्यापाऱ्यांचा नव्हे, तर भाजपच्या पाठबळावर निघाला आहे हे स्पष्ट आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा त्यामागे हात आहे.
विशेष प्रतिनिधी पुणे :ब्रिटीश व काही स्वदेशी इतिहासकारांनी मराठा साम्राज्यातील अनेक नायकांवर अन्याय इंग्रजांनी व काही अंशी स्वकियांनीही आपल्या इतिहासातील अनेक नायकांवर अन्याय केला. किंबहुना आपल्या हिंदवी स्वराज्याचा व…