
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी-एकनाथ गाडीवान
देगलूर -बिलोलीचे लोकप्रिय आ. जितेश भाऊ अंतापुरकर विधानसभा मतदारसंघातील शासकीय पायाभूत सुविधांचा विकासाला आता वेग येत आहे.आ.जितेश अंतापुरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.पावसाळी पुरवणी मागणीत एकूण १२ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी मतदारसंघातील मंडळ अधिकारी कार्यालय व तलाठी कार्यालयाच्या बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. बिलोली येथील मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयांच्या बांधकामासाठी ५८२ लक्ष रु. एवढा निधी मंजूर झाल्याने एकाच प्रशासकीय इमारती सर्व कर्मचारी अधिकारी उपलब्ध होणार असल्याने,सर्वसामान्य नागरिकांच्या चक्रा व त्रास कमी होतील, या निधीमुळे संबंधित शासकीय कर्मचा ऱ्यांना प्रशासकीय कामकाजासाठी सुसज्ज व कायमस्वरूपी इमारती उपलब्ध होतील, याचा थेट लाभ नागरिकांनाही मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही कामे प्रलंबित होती मात्र आ. जितेश भाऊ अंतापुरकर यांनी वारंवार मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा करीत ही योजना मार्गी लावली आहे. आमदार अंतापुरकर यांच्या कार्यामुळे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या प्रयत्नामुळे मतदार संघात शासकीय यंत्रणा गती मिळेल आणि जनतेला प्रभावी सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.