
दैनिक चालु वार्ता ठाणे-प्रतिनिधी-नागेश पवार
————-
ठाणे- आरामदायी व वातानुकूलित प्रवासासाठी प्रवासी शिवशाही बसला प्राधान्य देतात.परंतु ठाणे येथून कोल्हापूर ला जाण्यासाठी वंदना स्टँड येथून सकाळी ०५:१५ असलेली परंतु पाऊण तास उशिराने सोडण्यात आलेल्या बसच्या ड्रायव्हरच्या समोरील तुटलेली काच, नादुरुस्त आसन व्यवस्था, अस्वच्छता,फाटलेल्या सीट,उखडलेले पत्रे, अशा नादुरुस्त बस मधून प्रवास करताना प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने या बसच्या दुरावस्थेबाबत प्रवाशांनी ठाणे काँग्रेस चे प्रवक्ते राहुल पिंगळे यांना फोन वर संपर्क साधत माहिती दिली असता.त्यांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.या संपूर्ण घटनेने एसटी महामंडळाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. अक्षरशः प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
याबाबत बोलताना राहुल पिंगळे म्हणाले की आगारातून निघणाऱ्या बसेस सुस्थितीत आहेत का हे न बघता शिवशाही’ ची ठाणे-कोल्हापूर खराब बस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून चालवली जात आहे. खरे तर ठाण्याहून सुटणाऱ्या या शिवशाही बस मधून परिवहन मंत्र्यांनी प्रवास केला पाहिजे.म्हणजे त्यांना सर्वसामान्य नागरिकांच्या व्यथा कळतील. तसेच अशा खराब बसमुळे एखादा अपघात झाला तर याची जबाबदारी परिवहन मंत्री घेणार का ….?