
दैनिक चालु वार्ता वर्धा – उपसंपादक -अवधूत शेंद्रे
—————————————-
वर्धा – आष्टी :- येथील रहिवासी शेतकरी देवेंद्र गोपाळराव झाटे(५९) यांनी गळफास लावत आत्महत्या केली प्राप्त माहितीनुसार मृतक शेतकरी देवेंद्र झाटे यांच्याकडे मौजा दलतपूर शिवारात अडीच एकर शेती असून गेल्या दोन वर्षापासून सततची नापिकी आणि त्यापासून वाढता कर्जाचा डोंगर त्यामुळे आर्थिक विवंचनेत वावरत होते खाजगी सावकाराचे आणि बँक ऑफ इंडियाचे कर्ज याबाबत मृतक शेतकरी चिंतित असायचे वर्षे २०२२ मध्ये त्यांनी स्वमालकीची तीन एकर शेती विकली असल्याचे समजते यावर्षीच्या पेरणी हंगामात उसनवारीने पैसे काढून पेरणी केली असल्याचे बोलल्या जाते घरी कुणी नसल्याचे संधी साधून सायंकाळ दरम्यान शेतकरी देवेंद्र झाटे यांनी गळफास लावत आत्महत्या केली एकदम विनोदी स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून देवेंद्र झाटे तालुक्यात प्रसिद्ध होते त्यांनी अचानक घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे हळहळ व्यक्त केल्या जात आहे त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा आहे स्थानिक स्मशानभूमीत त्यांचेवर नातेवाईक, आप्तपरिवार आणि मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले