दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
जालना (मंठा )
कृषी दिनीच एका शेतकऱ्यांना कर्ज मागायला लाज कशी वाटत नाही? अशा अपमानजनक शब्दात हिणविण्यात आल्यानंतरही या प्रकरणाची तक्रार दिली म्हणून बँकेकडून ‘त्या’ शेतकऱ्यांवर खोटी पोलिसांत तक्रार दिली. मंठा पोलीसांनी चौकशी करत ‘त्या’ शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केला. त्यामुळे कर्ज तर सोडाच … आधी लाज काढली नंतर पोलीसांत खोटा गुन्हा दाखल केल्याची तक्रार शेतकरी वसंत सरोदे यांनी ता. ४ जूलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
🎆
नैराश्य आल्यामुळे आत्मदहन करणार
बँक शाखाधिकारी केडिया यांनी कर्ज तर सोडाच माझी लाज काढली नंतर पोलीसांत खोटा गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास १० जुलै रोजी आत्मदहन करणार असल्याचे सरोदे यांनी सांगितले.
🎆
यासंदर्भात बँक शाखाधिकारी भाग्यश्री केडिया यांना विचारले असता, त्यांनी मला मारण्याची भाषा केली होती. मला असुरक्षित वाटल्यामुळे मी तक्रार दिली.
🎆
जिल्हास्तरीय चौकशी ..
तळणी येथील बँक अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना अपमानजनक वागणूक दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याच दिवशी दुपारी १ वा. जिल्हास्तरीय बँक अधिकाऱ्यांनी तळणी शाखेला भेट दिली. यावेळी बंद खोलीत चौकशी झाली. पण , चौकशी संदर्भात बोलण्याचे अधिकाऱ्यांनी टाळले.
🎆
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशी …
तळणी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखाधिकारी केडीया यांनी शेतकऱ्यांना अपमानजनक शब्दात हिणविण्याचा प्रकार समोर आला होता. बँक शाखाधिकारी शुक्रवारी जालना जिल्हाधिकारी कार्यालय दिसून आला. याप्रकरणी दोन तास जिल्हाधिकार्यालयात चौकशी झाल्याचे सुत्रांनी सांगितले.