
दैनिक चालु वार्ता ठाणे जिल्हा प्रतिनिधी विकी जाधव
कल्याण ५ जुलै :कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिवहन सेवा (KDMT) अंतर्गत कल्याण – जांभुळ – वसत या ग्रामीण मार्गावर सार्वजनिक बस सेवा लवकरच सुधारित मार्गाने पुन्हा सुरू होणार आहे. याबाबत परिवहन अधिकारी श्री. किशोर घाडी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत येत्या दोन दिवसांत ही सेवा सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन देण्यात आले.
या निर्णयामुळे वसत, जांभुळ परिसरातील शालेय विद्यार्थी, कामगार, वयोवृद्ध नागरिक आणि महिलांना दिलासा मिळणार आहे. स्थानिकांनी अनेक दिवसांपासून या मार्गावर बस सेवेच्या नियमिततेबाबत तक्रारी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत सुधारित बस सेवा मार्ग आखण्यात आला आहे.
परिवहन विभागाने संबंधित मार्गाची पाहणी करून बसच्या वेळापत्रकातही सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्या पुढाकाराने ही बैठक पार पडली.