
दैनिक चालु वार्ता कोल्हापूर चंदगड प्रतिनीधी -संदिप कांबळे
चंदगड/ प्रतिनिधी:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोदाळी येथे आषाढी एकादशीच्या पंढरीच्या वारीचे औचित्य साधून शाळेत दिंडीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभुषेत टाळकरी, ध्वजपताकाधारी, डोक्यावर तुळस घेतलेली छोटीशी रखुमाई, वारकरी अशा वेगवेगळ्या वेशभूषा सादर करून ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात तल्लीन होऊन सर्व विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका व पालकही आनंदाने या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. तसेच या उपक्रमामुळे सर्वत्र या शाळेच्या शिक्षकांचे कौतुक होताना दिसत आहे.