
दैनिक चालू वार्ता अहमदपुर तालुका प्रतिनिधी- श्री हाणमंत जी सोमवारे
==============
लातूर(अहमदपुर):-
तालुक्यातील मुख्य ग्रामीण भागातील मौजे जवळगा येथील किलबिल नॅशनल स्कूल शाळेने आषाढी एकादशी निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन वृक्षदिंडीचे आयोजन केले होते. सदरील वृक्षदिंडी शॉपिंग सेंटर येथून निघाली . या दिंडीला शिवसेना जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी यांच्या हस्ते झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले. त्यापसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक संतोष रोडगे, शिवसेना शहर प्रमुख लक्ष्मण अलगुले, माजी नगरसेवक संदीप चौधरी ,रवी महाजन, डॉ सचिन भराडिया, संतोष मद्देवाड ,गुणाजी भगत, संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले , प्राचार्य संतोष पाटील, उपप्राचार्य धरमसिंग शिराळे ,सरोजा भोसले उपस्थित होते. दिंडी शहरातून थोडगा रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक ,डॉ बाबसाहेब आंबेडकर चौक आझाद चौक मार्गे पोलीस स्टेशन या मार्गातून निघाली. या दिंडीत शहरप्रमुख लक्ष्मण अलगुले, शशिकांत दामा, दिपक हलसे, कनक ज्वेलर्स चे दिनेश पाटील , अर्चना प्रोव्हिजन चे मनोज सोनी व संगमेश्वर ड्रेसेस चे नरसिंग कमठाने यांनी विद्यार्थ्यांना खाऊ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या म्हणी प्रमाणे झाडांची लागवड करणे ही काळाची गरज आहे.या दिंडीत विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन विविध पथनाट्य ,भारूड ,पताका नृत्य, लेझीम स्टिक डेमो सादर करत शहरातील नागरिकांना वृक्ष लागवडीसाठी आवाहन केले. या दिंडीची सांगता शहरातील पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक बी डी भुसणर यांच्या हस्ते गर्द सावली देणारी वृक्ष लागवड करून झाली. त्याप्रसंगी पोलीस स्टेशन चे कर्मचारी राजगीरवाड साहेब ,नागरगोजे मॅडम ,विक्रम भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन सचिन जगताप यांनी केले .
कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी, स्कूल बस स्टाफ उपस्थित होता .