
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने बाळासाहेब पाटोदे व मित्र मंडळ, उदगीर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्यदिव्य फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात हजारो वारकऱ्यांना व गरजू नागरिकांना प्रसाद रूपाने फराळ वाटप करण्यात आले. या उपक्रमाला वारकऱ्यांनी व नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी क्रीडा, युवक व कल्याण बंदरे मंत्री तथा उदगीर-जळकोट मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजय भाऊ बनसोडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. आमदार संजय बनसोडे यांनी आपल्या हस्ते वारकऱ्यांना फराळ वाटप करून या धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की, वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने होणारे हे आयोजन सामाजिक ऐक्य, श्रद्धा आणि भक्ती यांचे प्रतीक आहे.
या प्रसंगी श्री. बाळासाहेब पाटोदे, मनोज दादा पुदाले, सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, उदगीर शहराचे पोलीस निरीक्षक गाडे साहेब, विजय निटूरे, शेख जानमिया, वर्षाताई पंकज कांबळे, मधुमती कानशेटे, सीमाताई नेत्रगावकर, पत्रकार अशोक मामा कांबळे, सुभाष धनुरे सावकार, सारंग लोहारे, नारायण भोसले, सतीश पाटील मानकीकर, अभंग जाधव, अंकुश ताटपल्ले, प्रतीक शिंदे पाटील, अमोल पाटील, गुणवंत वाडकर, पंकज कालनी, दीपक बडे, गणेश मुंडकर, अजित फुलारी, गणेश जाधव, शिवशंकर पाटील, श्याम मोरे, राम मामा रावणगावे, नितेश गायकवाड, उदयभान जाधव, बालाजी नादरगे, कपिल सनशेट्ये, भानुदास कबनुरे, ओमकार पिंगळे, शिवकुमार बिरादार, राहुल आतनुरे, डी. एस. बिरादार, विकास बिरादार, विक्रम सूर्यवंशी, पवन ढोबळे, बाबासाहेब सूर्यवंशी, पंकज कालनी, ॲड. भाऊसाहेब जांभळे, नारायण कोयले, कनाडे कुमारेश्वर, आदित्य कनाडे, ज्यांनीमिया शेख, अरविंद बिरादार, राजकुमार गंडारे, अभिजीत सोमवंशी, अंकुश बामणे, वीरेंद्र पाटील, शुभम पाटील, सतीश कांबळे, केदार पुराणिक, भीम कनाडे, संतोष राठोड, शिवा ऊपर बावडे, शिवशंकर पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात हजारो वारकरी भक्त, भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठुरायाच्या भक्तीत तल्लीन असलेल्या या वारकऱ्यांसाठी फराळ वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा सुंदर उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.
बाळासाहेब पाटोदे व मित्र मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुकाचे व अभिनंदनाचे वातावरण आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम भव्यतेत आणि शिस्तबद्धतेत पार पडल्याने वारकरी भक्तांनी समाधान व्यक्त केले. अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमुळे धार्मिकतेसोबतच समाजात एकतेचे बळ वाढते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.