
दैनिक चालू वार्ता उप संपादक धाराशिव- नवनाथ यादव
धाराशिव,भुम (ता. ६ जुलै) :
आषाढी एकादशीनिमित्त कसबा येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात माजी नगराध्यक्ष संजय गाढवे व नगराध्यक्षा सौ. संयोगिताताई गाढवे यांनी सपत्नीक मंदिरात हजेरी लावून मूर्तीचे विधिवत पूजन केले व मनोभावे दर्शन घेतले.
या भक्तिमय वातावरणात विठ्ठल भजनी मंडळाच्या वतीने पारंपरिक टाळ-मृदंगाच्या गजरात पायी दिंडी सोहळा काढण्यात आला. या सोहळ्यात मा. नगराध्यक्ष गाढवे दाम्पत्य सहभागी झाले होते. त्यांनी उपस्थित भाविकांसोबत तुलसी पूजन व वीणेची पूजा करत सर्वांना आषाढीच्या शुभेच्छा दिल्या.
यानंतर सार्थक निवासस्थानी उपस्थित भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांच्या सेवा-पूजनात आणि दिंडी सोहळ्याच्या आयोजनात संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.