
दैनिक चालू वार्ता वैजापूर प्रतिनिधी – भारत सोनवणे
वैजापूर:-आषाढी एकादशी निमित्त वैजापूर शहरातील श्री एकटा विठोबा मंदिरात शहरासह तालुक्यातील वेगवेगळ्या भागातून भाविक भक्त मंदिरात दर्शनासाठी आले होते. सकाळी मान्यवरांच्या हस्ते श्रीहरी मूर्तीचे विधीवत पूजन करून श्रीहरी दर्शन भाविकांसाठी चालू करणण्यात आले.
श्री एकटा विठोबा पायी दिंडी सोहळा लोणी बुद्रुक ते वैजापूर पायी दिंडी सोहळ्यात सर्व भाविकभक्त आनंद घेत श्री एकता विठोबाचे दर्शन घेतले. दिंडी मंदिर परिसरात पोहचताच मंडळाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले दर्शनानंतर दिंडीतील वारकर्यांसह दर्शनासाठी येणाच्या
भाविकांना देखील प्रसाद वाटप करण्यात आला. पावसाने उघडीप दिल्याने दुपारनंतरही श्रीहरी दर्शनासाठी
भाविकांची रिघ लागली होती. मंदिरात दर्शनासाठी येणाच्या भाविकांना मुंजोबा मित्र मंडळाच्यावतीने दर्शन व्यवस्थापनासह पिण्याचे पाणी व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. यावेळी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.