
दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी- तुषार नाटकर
छ. संभाजीनगर ( पैठण): राजे संभाजी भोसले सैनिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय कांचनवाडी छत्रपती संभाजीनगर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.हरी कोकरे यांची उपस्थिती होती तसेच श्रीमती सुरेखा जैन, निर्मल निकुंभ, अमोल गिरी, श्रीमती मनीषा पाटील, श्रीमती महाजन आदीं मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी मनोगतामध्ये गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगून गुरूंविषयीची माहिती सांगितली व गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून आपल्या शिक्षकांना शुभेच्छा देत आशीर्वाद घेतला.
सदर कार्यक्रमात जेष्ठ शिक्षिका श्रीमती अनिता पलांडे यांनी गुरूंबद्दलचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. अध्यक्षीय समारोपात डॉ.हरी कोकरे यांनी माणसाच्या जडणघडणीमध्ये गुरूचं काय महत्त्व आहे हे विषद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन श्रीमती अर्चना स्वामी यांनी केले.