
दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी- तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण):
विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ, छत्रपती संभाजीनगर संचलित गोल्डन रॉक्स इंग्लिश स्कूल, पैठण येथे आज “गुरुपौर्णिमा” हा पवित्र दिवस अध्यात्मिक वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका श्रीमती मीना आव्हाड यांच्या हस्ते ज्ञानदेवता सरस्वती पूजनाने झाली. यानंतर महर्षी व्यास ऋषी यांच्या भूमिकेत विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरण केले. कियांश दुलगज आणि श्रीतीज बोबडे यांनी व्यास मुनींच्या भूमिकेतून कार्यक्रमात विशेष रंगत आणली.
या कार्यक्रमाला पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीमती बलदवा, दुलगज, दिलवाले, पातकळ, शेळके, सानवे, केरकर, बांदेकर, चेउलवार, जाधव, भुमरे, गोर्डे, दसपुते, वीर, गवळी, मगरे, कदम, गवाड, घायल, फसाटे, बोबडे, निलापल्ले, भनगे आदीं पालकांचा उपस्तिथीमुळे कार्यक्रम अधिक उत्साहवर्धक ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका श्रीमती मीना आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका श्रीमती प्राजक्ता गोसावी, वेदश्री काळे, अंजली थोरात, किरण केरकळ, सुनिता पटेल आणि महेश गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
शाळेत गुरुपौर्णिमेचा पवित्र सोहळा विद्यार्थ्यांच्या मनात गुरुांविषयी आदर, कृतज्ञता आणि संस्कारांची बीजे रोवणारा ठरला.