
दैनिक चालू वार्ता चाकूर – प्रतिनिधी किशन वडारे
————————————————-
लातूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांची भाजप युवा मोर्चाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान व स्वागत केले. या प्रसंगी रमेश पाटील यांनी त्यांच्याशी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच जनतेच्या सुरक्षिततेविषयी चर्चा केली.
पोलिस अधीक्षक अमोल तांबे हे महाराष्ट्र पोलिस दलातील कर्तव्यनिष्ठ व अनुभवी अधिकारी म्हणून ओळखले जातात. विविध ठिकाणी त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडत नागरिकाभिमुख कामाचा ठसा उमठवला आहे. त्यांच्या प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव, कार्यक्षमतेची ठसठशीत छाप आणि लोकाभिमुख दृष्टिकोन लातूर जिल्ह्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरेल, असा विश्वास रमेश पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना रमेश पाटील म्हणाले की, “लातूर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवून कायदा-सुव्यवस्था मजबूत करणे, तसेच पोलिस व जनतेमधील विश्वासाचे नाते अधिक घट्ट करणे हे आजच्या काळातील मोठे आव्हान आहे. अमोल तांबे यांच्या नेतृत्वाखाली हे उद्दिष्ट साध्य होईल, अशी खात्री वाटते.”
पोलिस अधीक्षक तांबे यांनीही संवाद साधताना सांगितले की, “लातूर जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्था आणि नागरिकांचा विश्वास हे माझ्यासाठी सर्वोच्च प्राधान्य असेल. पारदर्शकतेने व निष्ठेने काम करून पोलिस प्रशासनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.”
भाजप युवा मोर्चाच्या या सदिच्छा भेटीमुळे जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय वर्तुळात सकारात्मक चर्चेला सुरुवात झाली असून, आगामी काळात पोलिस प्रशासन अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.