दैनिक चालू वार्ता उपसंपादक धाराशिव-नवनाथ यादव
धाराशिव/भूम (प्रतिनिधी):
एकीकडे समाज व्यसनांच्या विळख्यात अडकतोय आणि दुसरीकडे काही संस्था “व्यसनमुक्त समाज” घडवण्यासाठी खऱ्या अर्थाने कार्य करत आहेत. अशाच कार्याचे जिवंत उदाहरण म्हणजे कैलासवासी विलासराव रोकडे फाउंडेशन संचलित स्वस्त मानस व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र, भूम.
गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमात २० रक्तदात्यांनी समाजहितासाठी आपले रक्तदान करून इतरांना प्रेरणा दिली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व गुरुंच्या पाद्यपूजनाने झाली. यावेळी हरिभक्त पारायण अरुण शाळू महाराज, योगगुरू संजीवन सातपुते सर आणि ब्रह्मकुमारी राजश्री दीदी यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळू महाराजांनी आपल्या भाषणात उपदेश दिला –
“आईवडिलांचे संस्कार अंगीकारा, व्यसनांना नाही म्हणा!
मनामधील वाईट विचारांना स्थान न देता, आरोग्यदायी जीवन स्विकारा.
व्यसनमुक्त होणे ही केवळ गरज नाही, ती काळाची हाक आहे!”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद वाघमारे यांनी तर आभार प्रदर्शन डायरेक्टर नवनाथ रोकडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल नलवडे, कमलेश डंबरे , संदीप निमटके आणि शुभम अवसारे यांनी मोलाचे सहकार्य केले.
