
दैनिक चालू वार्ताउप संपादक धाराशिव-नवनाथ यादव
धाराशिव/ भू म :-भाजपचे ज्येष्ठ नेते व भुम, परांडा, वाशी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय मार्गदर्शक बाळासाहेब क्षीरसागर यांची भारतीय जनता पक्षाच्या राज्य परिषद सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे संपूर्ण जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
क्षीरसागर हे संघटन कौशल्य, जनसंपर्क आणि निष्ठावान कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात. त्यांनी सातत्याने शहरी,ग्रामीण भागातील प्रश्न मांडत विकासाभिमुख राजकारण केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचे संघटन बळकट झाले असून, पक्षवाढीसाठी ते नेहमी तत्पर असतात.
या निवडीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त होत आहे. विविध गावांमध्ये जल्लोष, पेढे वाटप आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि फलक लावून आनंदोत्सव साजरा केला.
भविष्यात पक्ष अधिक बळकट होईल आणि शहरी व ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळेल, अशी भावना जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे संघटनेला नवे बळ मिळेल, असा विश्वास भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानेही व्यक्त केला आहे.