
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून भारताला टार्गेट करताना दिसत आहेत. काहीही करून भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता ते दबाव टाकत आहेत. युक्रेन आणि रशियाच्या युद्धाला भारतच जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला.
भारतापेक्षा अधिक चीन हा रशियाकडून तेल खरेदी करतो. मात्र, चीनवर कोणताही टॅरिफ अमेरिकेने लावला नाही. नाटो देशांना पत्र लिहित त्यांनी फक्त चीनवर कारवाई करा म्हटले. प्रत्यक्षात अमेरिकेने चीनवर कोणतीही कारवाई केली नाही. भारतावर अमेरिकेने लावलेल्या 50 टक्के टॅरिफनंतर भारत आणि चीनची जवळीकता वाढली आहे. मोठे करार दोन्ही देशांमध्ये झाले. चीन, रशिया आणि भारत अमेरिकेच्या विरोधात उभे एकत्र असल्याचे दिसत आहे.
भारत आणि अमेरिकेचे संबंध कायमच चांगले राहिले आहेत. मात्र, टॅरिफच्या तणावात ते ताणले आहेत. अमेरिका न्यू जर्सीचे राज्यपाल आणि डेमोक्रेटिक पार्टीचे वरिष्ठ नेते फिल मर्फी यांनी नुकताच भारत अमेरिकेतील सध्याच्या तणावावर भाष्य केले. हेच नाही तर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या सध्याच्या रणनीतीवर जोरदार टीका केली. त्यांनी स्पष्ट म्हटले की, अमेरिकेने जो भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, त्यामुळे काहीही साध्य होणार नाही.
हा पण हे होऊ शकते की, भविष्यात भारत आणि अमेरिकेत मोठा तेल व्यापार करार होऊ शकतो. रशियाकडून भारत तेल खरेदी करत असल्याने 25 टक्के टॅरिफ अमेरिकेने भारतावर लावलाय. त्यांनी युक्रेनसोबतच्या युद्धाला रशियाला दोषी ठरवले पण त्यांनी पुढे म्हटले की, भारतावर टॅरिफ लावून त्याचे समाधान निघणार नाहीये.
चीनबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट म्हटले की, चीनला कोणत्याही परिस्थितीमध्ये मोकळे सोडता येणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयावर त्यांनी चिंता व्यक्त केली. व्हिसा पॉलिसी चुकीच्या मार्गाने जात असल्याचे त्यांनी म्हटले. अमेरिकेच्या विकासामध्ये H-1B व्हिसा धारकांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या टॅरिफच्या निर्णयानंतर भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा देखील जवळपास बंद होती.