
हिंदीच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या ठाकरे बंधूंना भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा ललकारले आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे काही लॉर्ड नाहीत. मी खासदार आहे आणि कायदा हातात घेत नाही, असे त्यांनी त्यांनी म्हटले आहे.
हिंदी-मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवर खासदार दुबेंनी टीका केली होती. महाराष्ट्राबाहेर या आपटू आपटू मारू असे ते म्हणाले होते. आता पुन्हा एकदा एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीच्या दरम्यान दुबे यांना आपटू आपटू मारू, असे म्हणण्याची काय गरज होती? असा प्रश्न खासदार निशिकांत दुबे यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना निशिकांत दुबे म्हणाले, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे काही मोठे लॉर्ड साहेब नाहीत. मी खासदार आहे आणि कायदा हातात घेत नाही. राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक मारतील. पण जेव्हा केव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राबाहेर जातील तिथले नागरिक… मग ज्या कोणत्या राज्यात जातील, तिथे त्यांना आपटू आपटू मारतील.
मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
निशिकांत दुबे यांनी यापूर्वीही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना महाराष्ट्रावरही टीका केली होती. तुम्ही कोणाची भाकरी खात आहात? तिथे टाटा आहे, बिर्ला आहे, रिलायन्स आहे. कोणाचेही महाराष्ट्रात प्रकल्प नाहीये. तुम्ही आमच्या पैशांवर जगत आहात? तुम्ही कोणता कर भरत आहात? तुम्ही जर बॉस आहात, तर चला बिहारला. चला उत्तर प्रदेशला. तामिळनाडूला चला. तुम्हाला आपटून आपटून मारू, असे निशिकांत दुबे यांनी म्हटले होते.