
राज ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा !
मीरा-भाईंदरमध्ये राज ठाकरेंची सभा झाली. या सभेत राज ठाकरे हे मराठीच्या मुद्यावर प्रचंड आक्रमक झालेले दिसले. हिंदी लादण्यावरून सरकारला इशारा देत म्हणाले, तुमची सत्ता असेल ती विधानभवनामध्ये, लोकसभेमध्ये.
आमची सत्ता रस्त्यावर आहे. जर महाराष्ट्रात कोणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिकाचा हात अन् समोरच्याचा गाल यांची युती झाल्याशिवाय राहणार नाहीत.
मराठीच्या मुद्याची स्क्रीप्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लिहिल्याचा आरोप केला जात होता. त्याला देखील राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘अनेक सरकारी पत्रकार असतात, बेरोजगार पत्रकार असतात ते कोणत्या युट्यूब चॅनेलवर जातात आणि म्हणतात फडणवीसांनी लिहिलेली स्क्रीप्ट आहे. कोणता स्क्रीप रायटर आहे जो स्व:ताचा अपमान पण लिहितो त्यात. सगळ्यांकडून दबाब आल्यानंतर हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर मी मागे घेत आहे, हे स्क्रीप रायटर लिहू शकतो? पण तुमच्या मनात विष कालवायचे सुरु आहे.’
देवेंद्र फडणवीसांचे नाव न घेत थेट इशारा देत ठाकरे म्हणाले, ‘कोणाशी माझी मैत्री असो दुश्मनी असो काहीही असो एक गोष्ट निश्चित सांगतो महाराष्ट्राच्या बाबतीत, मराठी माणसाच्या बाबतीत आणि मराठी भाषेच्या बाबतीत राज ठाकरे कोणीशी तडजोड करणार नाही. याच्या आधी केली नाही आताही करणार नाही आणि यानंतरही करणार नाही.
…तर शाळाही बंद पाडेल
‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले म्हणे की आम्ही तिसरी हिंदी भाषा सक्तीची करणार म्हणजे करणार. जर राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर त्यांनी बेशक करावी. त्या दिवशी मोर्चाच्या धसक्याने निर्णय मागे घ्यावा लागला होता. फडणवीसजी तुम्ही सांगताना तिसरी भाषा सक्तीची आम्ही आणणार म्हणजे आणणार. मी आत्ता सांगतोय तुम्ही पहिली ते पाचवी हिंदी आणण्याचा प्रयत्न तर करून बघा दुकानंच नाही शाळाही बंद करीन, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.