
दैनिक चालु वार्ता उमरगा प्रतिनिधी – मनोज कुमार गुरव
उमरगा (धाराशिव) देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी एक पेड मा के नाम हे ब्रीद समोर ठेवून जल, जंगल, जमीन, संवर्धनासाठी
ओसाड वाटणाऱ्या धाराशिव जिल्ह्यात. एक कोटी 50 लाख वृक्ष लागवडीचा उद्दिष्ट ठेवून. जिल्हाधिकारी श्री.किरणकुमार पुजार त्यांच्या उत्तम नियोजनाने आणि जिल्ह्यातील सर्व शासकीय खात्याचे कर्मचारी जिल्ह्यातील कृषी आधारित उद्योग चालवणाऱे व्यापारी स्वयंसेवी संस्था, बचत गट शाळा सर्वांना एकत्रित घेऊन, दिनांक 19 जुलै 2025 रोजी एक कोटी पन्नास लक्ष वृक्ष लागवड करून जागतिक रेकॉर्ड बनवण्याचे, आणि धाराशिव जिल्ह्याला हरित धाराशिव तयार करण्यासाठी उत्तम नियोजन केले होते.
यावेळी धाराशिव जिल्ह्यातील कृषी उद्योगावर आधारित धाराशिव जिल्हा फर्टीलायझर्स सीड्स आणि पेस्टिसाइड डीलर्स असोसिएशनचे स्वतंत्र बैठक घेऊन.
धाराशिव जिल्हा अध्यक्ष श्री विठ्ठलराव बदोले आणि धाराशिव जिल्ह्यातील सर्व खत बियाणे आणि औषधे विक्रेते त्यांची स्वतंत्र बैठक घेऊन.
हरित धाराशिव 2025 महाअभियाना सहभागी होण्याचे विनंती केले होते.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी
उमरगा तालुक्यातील मौजे कसगी येथे श्री सिद्धेश्वर विद्यालयाच्या परिसरात
वड, पिंपळ,औदुंबर, चिंच, साग, कडुलिंब, मिली डुबिया, तुती, असे बहुवार्षिक 551 वृक्षांची लागवड
सकाळी सात पासून श्री विठ्ठलराव बदोले यांच्या शुभहस्ते वृक्ष लागवड करून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी लक्ष्मीचंद्र कृषी सेवा केंद्र चे प्रोप्रायटर श्री विनय बदोले
गुरुदत्त शेती विकास केंद्राचे प्रो.प्रा श्री अमरसिंग ठाकूर
संस्थेचे संचालक श्री राम मोरे श्री भीमाशंकर बोरुटे या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
विद्यालयातील एक विद्यार्थी एक झाड ही उद्दिष्ट ठेवून मुख्याध्यापक श्री माशाळे सर 551 विद्यार्थी 551 झाडे लावून महा अभियान यशस्वी करण्यात आले.
यावेळी विद्यालयातील सर्व कर्मचारी बांधव विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.