
दैनिक चालु वार्ता ठाणे-प्रतिनिधी-नागेश पवार
दिवा – एकेकाळी दिवा शहराचा मानबिंदू असलेला दिवा स्टेशन परिसरातील तलाव, आज जवळ जवळ १७ ते १८ वर्ष झाली मृतअवस्थेत आहे , ह्या तलाव परिसरात मातीचे भराव करून त्याचे पात्र बुजवून अनधिकृत गाळे बांधण्यात आले आहेत , स्टेशन परिसरात बसणारे मच्छी विक्रेते , भाजी वाले त्यात घाणीचे पाणी व इतर कचरा टाकत आहे.
कधीकाळी संपूर्ण दिवा शहरातील घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन या तलावात होत होते. स्थानिक रहिवाशांच्या इतर सर्व विधी तलावावर संपन्न होत होत्या ,
परंतु आजची स्थिती खूपच भयाण आहे , संपूर्ण तलाव आणि आजुबाजूच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्टेशनवरून ये जा करणाऱ्या सर्व नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
आज या सर्व समस्या घेऊन स्थानिक आमदार राजेश मोरे यांची दिवा भाजप शिष्टमंडळाने भेट घेऊन तलावाचे सुशोभीकरण करण्यात यावे यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करण्यासाठी निवेदन दिले. तसेच लवकरच संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पा चे आगमन होणार आहे , गणेशोत्सवकाळात श्री गणेशाच्या मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची मागणी देखील दिवा भाजप च्या वतीने करण्यात आली , आमदार साहेबांनी देखील सकारात्मक चर्चा करून लवकरात लवकर आपण निधी उपलब्ध करू असे आश्वासन दिले.
सदर प्रसंगी भारतीय जनता पार्टी दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर , अशोक बाबुराव पाटील ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य , गणेश पद्माकर भगत ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य , रोशन भगत ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य , दिलीप भोईर माजी मंडळ अध्यक्ष , समीर नारायण चव्हाण दिवा मंडळ सरचिटणीस , अंकुश मढवी , जयदीप भोईर व्यापारी सेल अध्यक्ष , श्रीधर पाटील ओबीसी मोर्चा अध्यक्ष , अजय सिंग अशोक गुप्ता उ.भा.मोर्चा अध्यक्ष , आदी पदाधिकारी उपस्थित होते.