
राजू शेट्टींचे राजेश क्षीरसागरांना ओपन चॅलेंज !
शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन करता करता आमदार राजेश क्षीरसागर इतके वाहवत गेले आहेत की माझी 500 एकर जमीन असल्याचा जावईशोध त्यांनी लावला आहे. सदर 500 एकराचे सात बारे घेऊन राजेश क्षीरसागर येत्या 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजता मी स्वत: बिंदू चौकात हजर राहतो त्यांनी त्याठिकाणी यावे ती सर्व 500 एकर जमीन मी त्यांच्या नावावर करणार असल्याचे ओपन चॅलेंज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे.
500 एकर जमीनीचे सात बारे त्यांनी दाखवावे
राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांच्याकडे 500 एकर जमीन असल्याचा आरोप प्रसारमाध्यमातून केला होता. याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले कि मी गेल्या 25 वर्षात सार्वजनिक क्षेत्रात पाच निवडणुका लढविल्या. त्या निवडणुकीत मी माझ्या चल व अचल संपत्तीचे विवरणपत्र दिले आहे. त्या विवरणपत्रा व्यतिरिक्त राजेश क्षीरसागर यांनी आरोप केलेल्या 500 एकर जमीनीचे सात बारे त्यांनी दाखवावे.
त्यांच्या नावे असणारी सर्व संपत्ती अंबाबाई मंदिराच्या नावे करावी
राजू शेट्टी हे दोन दिवस दौऱ्यासाठी जिल्ह्याबाहेर आहेत. उद्या 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजता राजू शेट्टी स्वत: बिंदू चौकात हजर राहणार आहेत. आमदार राजेश क्षीरसागर यांनी लोकसभेतील विवरण पत्राव्यतिरिक्त 500 एकर जमीनीचे सात बारे त्यांनी दाखवावे ती सर्व जमीन राजेश क्षीरसागर यांचे नावे बक्षिसपत्र करणार आहेत. जर राजेश क्षीरसागर यांनी शनिवारी दुपारी 12 वाजता बिंदू चौकात न आल्यास त्यांनी त्यांच्या नावे असणारी सर्व संपत्ती करवीर निवासनी आई अंबाबाई मंदिराच्या नावे करावी असे आव्हान शेट्टी यांनी राजेश क्षीरसागर यांना दिलं आहे.