
हा व्हिडिओ तुमच्या काळजाचा थरकाप उडवू शकतो… बहिणीकडे गेलेली महिला आपल्या लहान मुलीसह घरी जाण्यासाठी बाहेर पडले. चिमुरडी इकडे तिकडे धावत होती. आईनं प्रेमानं धपाटा दिला आणि तिला चप्पल स्टॅण्डवर बसवलं.
चिमुकलीची चप्पल घेण्यासाठी ती खाली वाकली आणि दोन सेकंदासाठी पाठ फिरताच..
नियतीनं खेळ केला. चिमुकली झटकन उभी राहिली आणि खिडकीवर बसायला गेली, मात्र त्याचवेळी तिचा तोल गेला आणि आईच्या डोळ्यादेखत चिमुकली खाली कोसळली. यावेळी आईचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेने इमारतील रहिवासी हादरुन गेले होते. वसईजवळील नायगावमधल्या एका इमारतीत काळजाचा ठोका चुकवणारा हा धक्कादायक प्रकार घडलाय.चिमुकलीला जवळच्या महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
याआधीही पुण्यात एका इमारतीत आई घराबाहेर गेली असताना
4 वर्षीय चिमुकली खिडकीबाहेर लोखंडी जाळीला लटकल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. जवळच असलेल्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यानं तत्परतेने धाव घेत तिचा जीव वाचवला होता.चिमुरड्यांसोबतच्या या वाढत्या घटना पाहता पालकांनी सजग राहणे गरजेचे आहे. अन्यथा पालकांची एक चूक किंवा थोडासा निष्काळजीपणाही चिमुरड्यांच्या जीवावर बेतू शकते…