
दैनिक चालु वार्ता शिराढोण प्रतिनिधी -गजानन देवणे
लोहा तालुक्यातील गोळेगाव हे बुद्ध भूमीसाठी परिचीत असून याठिकाणी वर्षावासाच्या या पावन महिन्यात भंते बोधीधम्मो हे अधिष्ठान करत आहेत. भंते बोधीधम्मो यांच्या कुटीला आग लागून जळून खाक झाली असून अतोनात नुकसान झाले आहे. सविस्तर वृत्त असे की, गोळेगाव येथील भंते बोधीधम्मो यांच्या कुटीला आग लागून जळून खाक झाली असून हा प्रकार दि. २४ जुलै रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. यावेळी भंते बोधीधम्मो हे जवळा येथे भोजनासाठी गेले होते. त्यानंतर काही अपरिहार्य कारणास्तव नांदेडमध्ये गेले होते. भंतेच्या कुटीला आग लागलेली पाहुन परिसरातील श्रध्दावान उपासकानी धावपळ करून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. पण कुटी मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली आहे. याप्रसंगी कुटी मधील काही वापरावयाच्या वस्तु बाहेर काढल्या. परंतु कुटीचे आतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे श्रध्दावान उपासक, उपासिका यांना हि माहिती समजताच समाजामध्ये हळहळ निर्माण होत आहे.