
माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाथरूडमध्ये युवासेनेचा अभिनव सामाजिक उपक्रम!
दैनिक चालू वार्ता
संपादक धाराशिव
नवनाथ यादव
धाराशिव /भू म :- माणुसकीला प्राधान्य देणारा एक आदर्श उपक्रम पाथरूड गावाने नुकताच अनुभवल असून माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त, धाराशिवचे लोकप्रिय खा.ओमराजे निंबाळकर यांच्या संकल्पनेतून, पाथरूड येथे तब्बल 114 वयोवृद्ध नागरिकांना मोफत ॲल्युमिनियम काठीचे वाटप करण्यात आले.
ही फक्त काठी नव्हे… ही होती चालण्याची ताकद, आधाराची भावना आणि शिवसेनेच्या सेवाभावाची साक्ष!
शिवसेनेच्या या उपक्रमामुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं, आणि त्यांना मिळाला चालण्याचा, जगण्याचा नवाच उत्साह.ही आहे लोकांच्या हृदयात पोहोचणारी शिवसेनेची कार्यपद्धती.या कार्यक्रमात डॉ. चेतन बोराडे (उपजिल्हाप्रमुख), प्रा. तानाजी बोराडे (गटनेते व उपसरपंच), सरपंच शिवाजी तिकटे, भाऊसाहेब बोराडे (युवा उद्योजक), गजेंद्र खुणे (विभागप्रमुख), बिबीशन तात्या तिकटे, संदिपान पवार (व्हॉईस चेअरमन), अनिल तिकटे, संतोष गजरे, अनिल लेकुरवाळे, नवनाथ गोरे, उत्तम बोराडे, बंडू दुधाळ, अशोकराज बोराडे, नागेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाबाबत वृद्धांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं,
👉 “आज आम्हाला वाटलं, की कोणीतरी आपला आहे…!”
हा उपक्रम केवळ एक वाटप नव्हे… ही होती माणुसकीची शिवधारा.