
*गोविंदांच्या सुरक्षेसाठी युवासेनेचा ऐतिहासिक निर्णय!*
*पूर्वेश सरनाईकांचा धाराशिवमध्ये जंगी सत्कार – दहीहंडी गोविंदांसाठी विमा संरक्षण जाहीर!*
दैनिक चालू वार्ता
उप संपादक धाराशिव
नवनाथ यादव
धाराशिव (प्रतिनिधी) –
युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या धडाकेबाज प्रयत्नामुळे यंदाच्या दहीहंडी सणाला गोविंदांचा विमा संरक्षण कवच लाभणार आहे! या ऐतिहासिक निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील गोविंदांचे संरक्षण सुनिश्चित झाले असून, युवासेना धाराशिवच्यावतीने सरनाईक यांचा विशेष सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले.
ठाणे येथील पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत विकासकामांचा अहवाल सादर करण्यात आला. या बैठकीत युवासेना पदाधिकारी, सैनिक व मार्गदर्शकांनी उत्साहात सहभाग घेतला. दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर गोविंदांसाठी विमा संरक्षण मिळवून देण्याचा निर्णय म्हणजे सामान्य कार्यकर्त्याच्या सुरक्षेचा थेट विचार करणारा निर्णय असल्याचे मत सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
या बैठकीस मुख्य सचिव राहुल लोंढे, मराठवाडा सचिव निलेश शिंदे, जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे, निरीक्षक आकांक्षा चौगुले, समन्वयक नितीन लांडगे, शिवसेना वैद्यकीय जिल्हाप्रमुख पांडुरंग धस, तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या शेवटी पूर्वेश सरनाईक यांनी ठाम शब्दांत युवासैनिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युद्धपातळीवर उतरून कामास लागा असा संदेश दिला.
🔥 गोविंदांना विमा, तर कार्यकर्त्यांना दिशा – युवासेनेचा निर्धार स्पष्ट!