
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचं संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) भाषण सुरु आहे. जगातील अनेक देश गाझा पट्टीत इस्रायलकडून सुरु असलेल्या कारवाईचा निषेध करत आहेत. आज बेंजामिन नेतन्याहू ज्यावेळी बोलत होते, तेव्हा संयुक्त राष्ट्राचा हॉल जवळपास रिकामी होता.
कारण त्यांच्या भाषणाआधी अनेक देशांचे प्रतिनिधी बाहेर निघून गेले.
इस्रायलने लेबनानमध्ये हिजबुल्लाह सदस्यांचे शेकडो पेजर उडवले हे नेतन्याहू यांनी सांगताच इस्रायलच्या प्रतिनिधीमंडळाने जोरदार टाळ्या वाजवल्या. CNN च्या रिपोर्ट्नुसार या स्फोटात कमीत कमी 37 जणांचा मृत्यू झालेला. यात काही लहान मुलं सुद्धा होती. त्याशिवाय जवळपास 3000 लोक जखमी झालेले. लेबनानच्या आरोग्य विभागाने त्यावेळी ही माहिती दिलेली.
नेतन्याहू काय म्हणाले?
संयुक्त राष्ट्र महासभेत भाषणाच्या सुरुवातीला इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराण आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात इस्रायलच्या कारवाईवर जोर दिला. नेतन्याहू म्हणाले की, “मागच्यावर्षी आम्ही हुती बंडखोरांवर अनेक हल्ले केले. यात कालचा हल्ला सुद्धा आहे. आम्ही हमासची शक्ती संपवली आहे. आम्ही हिजबुल्लाहला कमकुवत केलय. त्यांचे अनेक नेते आणि शस्त्रास्त्र भंडार नष्ट केले.
आमच काम पूर्ण झालेलं नाही
नेतन्याहू म्हणाले की, “हमासची ताकद कमी झालीय. पण त्यांचा धोका अजूनही कायम आहे. त्यांनी 7 ऑक्टोंबरसारखा हिंसाचार पुन्हा करण्याची शपथ घेतली आहे. आमच्या लोकांचा भक्कमपणा, आमच्या सैनिकांच शौर्य आणि आमचे साहसिक निर्णय यामुळे इस्रायल आपल्या अंधाऱ्या दिवसातून बाहेर पडून मोठं सैन्य यश मिळवू शकला. पण अजून आमच काम पूर्ण झालेलं नाही”
डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणार
नेतन्याहू सोमवारी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. वेस्ट बँकेचा इस्रायलमध्ये समावेश करण्यापासून रोखणार असं आश्वासन ट्रम्पनी दिलय. डोनाल्ड ट्रम्प यांनाी इस्रायल-हमास युद्ध संपवायच आहे त्यासाठी ते प्रयत्न सुद्धा करतायत. पण इस्रायल आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना यश मिळत नाहीय.